मुंबई महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?; राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:12 IST2026-02-06T13:09:49+5:302026-02-06T13:12:09+5:30

मुंबईत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. सत्ता समीकरणात स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा कळीचा ठरत आहे

Will the number of MNS corporators in Mumbai Municipal Corporation increase?; Raj Thackeray MNS Demand to Uddhav Thackeray for Nominated Councillor | मुंबई महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?; राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी

मुंबई महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांची संख्या वाढणार?; राज ठाकरेंची खेळी, पडद्यामागे घडामोडी

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. येत्या ११ फेब्रुवारीला मुंबईत महापौर, उपमहापौरपदाची निवड होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निकालात भाजपाचे सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आलेत. त्या खालोखाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६५, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २९  आणि मनसेचे ६, एमआयएमचे ८ याशिवाय इतर नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांची निवड करता येऊ शकते.

मुंबईत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. सत्ता समीकरणात स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा कळीचा ठरत आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १० स्वीकृत नगरसेवकांची निवड करता येणार आहे. याआधी ही संख्या ५ इतकी होती. त्यात स्वीकृत नगरसेवकाच्या एका जागेसाठी मनसेने उद्धवसेनेकडे आग्रह धरला आहे. संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांचे जागावाटप होते. त्यात सर्वाधिक ८९ जागा जिंकणाऱ्या भाजपाला ४ स्वीकृत नगरसेवक निवडता येतील. त्यानंतर संख्याबळानुसार उद्धवसेना, शिंदेसेना आणि काँग्रेसच्या वाट्याला जागा येतील. 

महापालिकेतील संख्याबळ पाहता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला ३ स्वीकृत नगरसेवक निवडण्याची संधी मिळणार आहे. मात्र या ३ पैकी एक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्यावी अशी आग्रही मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात मनसेने सामंजस्याची भूमिका घेत ५३ जागांवरच उमेदवार उभे केले होते. त्यामुळे आता त्याची परतफेड म्हणून किमान १ स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळावे अशी भावना मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याशिवाय सत्ताधारी पक्षाकडूनही मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. मनसेचे ६ नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहे. त्यात नगरसेवकांना महत्त्वाची पदे मिळावी आणि स्वीकृत नगरसेवक मिळावे यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. परंतु उद्धवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर मनसे इतर पर्यायांचाही विचार करू शकते असेही संकेत देण्यात येत आहेत. आता उद्धव ठाकरे मनसेची ही मागणी पूर्ण करणार का यावर मनसेची पुढील रणनीती ठरणार आहे. 

दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांना निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील चर्चेत सहभागी होण्याची आणि प्रश्न मांडण्याची संधी मिळते. त्यांना दरमहा मानधन आणि विकासकामांसाठीही निधी दिला जातो. मात्र या स्वीकृत नगरसेवकांना मतदान करता येत नाही. महत्त्वाच्या पदांवर म्हणजे महापौर, स्थायी समिती किंवा इतर समितीच्या अध्यक्षपदी बसता येत नाही. मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांना धोरणात्मक निर्णयावर प्रभाव टाकण्याची क्षमता निवडून आलेल्या सदस्यांपैकी कमी असते. 

Web Title : मुंबई मनपा में मनसे की नजर; राज ठाकरे की रणनीतिक चालें।

Web Summary : मुंबई में मनसे शिवसेना से एक मनोनीत पार्षद सीट चाहती है। बीएमसी चुनाव के बाद, मनसे प्रमुख पदों और विकास निधि के लिए रणनीतिक गठजोड़ का लाभ उठाकर प्रभाव बढ़ाना चाहती है। उद्धव ठाकरे का निर्णय महत्वपूर्ण है।

Web Title : MNS eyes Mumbai civic body boost; Thackeray's strategic moves.

Web Summary : MNS seeks a nominated councilor seat from Shiv Sena in Mumbai. With BMC elections concluded, MNS hopes to increase influence, leveraging strategic alliances for key positions and development funds. Uddhav Thackeray's decision is crucial.