लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 10:16 AM2021-07-22T10:16:51+5:302021-07-22T10:16:58+5:30

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत.

Will relax restrictions for citizens who have taken two doses of the vaccine; Information of Maharashtra Health Minister Rajesh Tope | लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

googlenewsNext

मुंबई: राज्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दुसऱ्या लाटेत कमी होत असल्याचं चित्र असलं तरी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काळजी घेतली जात आहे. राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केलं जायचं. आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, आमची अपेक्षा आहे की, महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. आम्ही रोज जशी लस येईल तसं अडीच-तीन लाख लसीकरण करतोय. लस जास्त प्रमाणात मिळाली तर हे प्रमाण वाढेल. जर ७० ते ८० टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

अद्याप लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, असा मला आशावाद आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात ४ कोटी १ लाख लोकांनी घेतली लस-

राज्याने पुन्हा एकदा लसीकरणात विक्रम रचला आहे. चार कोटी लोकांच्या लसीकरणाचा टप्पा मंगळवारी ओलांडण्यात आला. लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आतापर्यंत एकूण ४ कोटी १ लाख ८ हजार ५७४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात १ लाख ८९ हजार ७३३ जणांना लस देण्यात आली.

राज्यात १२ लाख ८४ हजार ६२९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ८७ हजार ५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख ११ हजार ६०६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १० लाख ६८ हजार ६११ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ९८ लाख ७९ हजार ६११ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ४ लाख २० हजार ९२४ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Web Title: Will relax restrictions for citizens who have taken two doses of the vaccine; Information of Maharashtra Health Minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.