Who says Country patriots become sellers, government is acting like drunkards, praskash ambedkar on modi sarkar | 'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय'

'देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखं वागतंय'

मुंबई - वंचित बहुजन महाआघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील पब्लिक सेक्टर हे पब्लिक सेक्टर न राहता प्रायव्हेट सेक्टर होत आहे. बँका डुबल्या असून देशातील भारत पेट्रोलियम, एअर इंडिया या कंपन्यांची विक्री सरकारकडून होत आहेत. या रांगेत अजून सरकारी कंपन्या आहेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

शेअर मार्केटमध्ये भारत पेट्रोलियम आणि एअर इंडियाचे किती शेअर आहेत, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे, सरकारने एक समिती नेमूण नागरिकांना हे शेअर विकत घेण्याचं आवाहन करावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सूचवले आहे. सरकारचा महसूल पूर्णपणे ढासळला आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग सरकार विकत आहे. सरकार स्वत:कडील नवरत्न विकत आहेत, जसं दारूडा आपल्या घरातील सामान आणि बायकोचे दागिने विकतो, तसेच हे सरकार नवरत्न म्हणजे देशाचे दागिने विकण्याचं काम करत आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सरकारने लोकांना शेअर विकून नागरिकांना सोबत घेऊन हे नवरत्न सरकारमार्फत सुरू ठेवावेत, लाखो लोकं यामध्ये सहभागी होती, अशी आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. तसेच, यासाठी आम्ही सरकारला 15 दिवसांचा अवधी देतोय, असेही ते म्हणाले. अन्यथा, निवृत्त न्यायाधीशांना सोबत घेऊन आम्ही एक समिती नेमणूक करुन, देशातील नागरिक एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिमयचे शेअर किती रुपयांना विकत घेतील, याचा अभ्यास करू. आज, स्वत:ला देशभक्त म्हणणारे देश विकणारे झालेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.   
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Who says Country patriots become sellers, government is acting like drunkards, praskash ambedkar on modi sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.