मुंबईत आजही पावसाचे थैमान कायम राहणार; शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 11:39 IST2024-07-22T10:48:13+5:302024-07-22T11:39:49+5:30
Mumbai Rain Update: हवामान खात्याकडून आज पुन्हा एकदा शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत आजही पावसाचे थैमान कायम राहणार; शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा
Mumbai Weather Forecast ( Marathi News ) : मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असून रस्ते आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत होत आहे. हवामान खात्याकडून आज पुन्हा एकदा शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. "मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे," अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मुंबईत मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
भरती-ओहोटी कधी?
आज : भरती - दुपारी - १२:५० वाजता - ४.५९ मीटर
ओहोटी - सायंकाळी - ०६:५७ वाजता - १.५५ मीटर
उद्या : भरती - मध्यरात्री - १२:४५ वाजता - ४.०७ मीटर
ओहोटी - (उद्या - दि.२३.०७.२०२४) - सकाळी - ०६:३६ वाजता - ०.३३ मीटर
मुंबईत किती पाऊस कोसळला?
काल सकाळी ८ ते आज (२२.०७.२०२४) सकाळी ८ वाजेपर्यंत या २४ तासांच्या कालावधीत मुंबई महानगरात कोसळलेला सरासरी पाऊस
मुंबई शहर - १३५ मिमी.
पूर्व उपनगरे - १५४ मिमी.
पश्चिम उपनगरे - १३७ मिमी.
मुंबईत काल (२१.०७.२०२४) सकाळी ८ वाजेपासून आज (२२.०७.२४) सकाळी ८ वाजेपर्यंत (२४ तास) सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे. (नोंद मिलिमीटरमध्ये)
- शहाजी नगर महानगरपालिका शाळा ( ट्रॉम्बे, मानखुर्द) २४१
- नूतन विद्यामंदिर (मानखुर्द) २२४
- नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा (वडाळा) २२३
- 'एन' विभाग कार्यालय २१५
- मानखुर्द अग्निशमन केंद्र २१२
- आदर्श नगर महानगरपालिका शाळा (वरळी) २०४
- शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा २०३
- रमाबाई महानगरपालिका शाळा (घाटकोपर) २०२
- वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) अग्निशमन केंद्र १९९
- नारळवाडी महानगरपालिका शाळा (सांताक्रूझ) १९७
- सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा १९७
- जी दक्षिण विभाग कार्यालय १९४
- मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा १८९
- बनाना लिफ जुहू नर्सरी १७२