"We have no interest in Changu Mangu's nonsense"; Rane targets CM-Raut interview | "चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही"; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा

"चंगू मंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही"; मुख्यमंत्री-राऊत मुलाखतीवर राणेंचा निशाणा

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  'अभिनंदन मुलाखत' सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे आज रिलीज करत 'उद्या धमाका' असं लिहिण्यात आले आहे.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये नेमके काय असणार, मुख्यमंत्री नेमके काय बोलणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना संजय राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. 

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही, अशा लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगू च्या फालतू गप्पा, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षपूर्तीचा कामांचा अहवाल लोकांपुढे लवकरच ठेवला जाईल असे सांगितले होते. तो अहवाल याच मुलाखतीतून मुख्यमंत्री मांडणार तर नाहीत ना, अशी उत्सुकताही अनेकांना लागली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपाने टीका केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडीविरोधात भाजपा नेत्यांच्या चाललेल्या कुरघोड्या, त्यांना हात धुन्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आदी या मुलाखतीचा मूळ भाग असण्याची शक्यता आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "We have no interest in Changu Mangu's nonsense"; Rane targets CM-Raut interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.