Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 06:48 AM2019-10-01T06:48:03+5:302019-10-01T06:48:19+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य यांनीच सोमवारी वरळीत आपल्या उमेदवारीची घोषणा केली.

Vidhan sabha 2019: Aditya Thackeray is the first Thackeray to contest Election! | Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!  

Vidhan sabha 2019 : निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे!  

googlenewsNext

मुंबई : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य यांनीच सोमवारी वरळीत आपल्या उमेदवारीची घोषणा केली.
यापूर्वी ठाकरे घराण्यातील कोणीही निवडणूक लढविली नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत:ला रिमोट कंट्रोल म्हणवून प्रत्यक्ष निवडणुकीपासून लांब राहण्याचे जाहीर केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कधी निवडणूक लढविली नाही. राज यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. मात्र, लढविली नाही. आदित्य हे निवडणूक लढविणारे पहिले ठाकरे आहेत. शिवसेनेच्या इतिहासातील ही महत्त्वाची घटना मानली जाते.
वरळीतून आदित्य निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे आ. सुनील शिंदे यांनी माघार घेतली, शिवाय वरळीतील वजनदार नेते सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे वरळीची जागा शिवसेनेला सुरक्षित वाटत आहे.
 

Web Title: Vidhan sabha 2019: Aditya Thackeray is the first Thackeray to contest Election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.