Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीने दिली निष्ठावंतांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 05:52 AM2020-05-11T05:52:39+5:302020-05-11T05:53:01+5:30

शिंदे आणि मिटकरी हे दोघेही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी राज्यभर भाजप सरकारच्या विरोधात भाषणे करून स्वत:ची वेगळी हवा तयार केली होती.

 Vidhan Parishad Election: NCP gives opportunity to loyalists | Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीने दिली निष्ठावंतांना संधी

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीने दिली निष्ठावंतांना संधी

Next

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे व अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. शिंदे आणि मिटकरी हे दोघेही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी यांनी राज्यभर भाजप सरकारच्या विरोधात भाषणे करून स्वत:ची वेगळी हवा तयार केली होती. राष्ट्रवादीसाठी ते स्टार प्रचारक होते. पक्षाने त्यांना प्रचारासाठी
म्हणून हेलिकॉप्टरही देऊ केले होते. भाषणांच्या माध्यमातून आमदारकीचे तिकीट मिळवणारे मिटकरी हे या काळातील पहिले भाग्यवान ठरले आहेत. धनंजय मुंडे यांच्या भाषणाने विधानपरिषद मागची पाच वर्ष गाजली होती.

आता अमोल मिटकरी च्या रूपाने फायर बँड नेता पक्षाला मिळाला आहे. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने कोरेगाव मतदारसंघ शिवसेनेसाठी कायमचा सोडल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदे आधी जावळी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. नंतर त्यांनी मतदार संघ बदलून कोरेगाव मतदार संघ निवडला होता. हा मतदारसंघ पूर्वी शालिनीताई पाटील यांचा होता.

कोरेगाव मधून शिंदे दोन वेळा निवडून आले. २०१९ ला हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यात शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेचे महेश शिंदे यांनी पाच हजार मतांनी पराभव केला होता. आता महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे पुन्हा मतदारसंघाची अडचण येऊ नये यासाठी शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.

Web Title:  Vidhan Parishad Election: NCP gives opportunity to loyalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.