Video : 'तिरंग्याला' साक्षी मानून शपथ घेतो की.... आमदारांमधला वेगळाच भिडू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:05 PM2019-11-27T19:05:05+5:302019-11-27T19:07:04+5:30

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या

Video : The 'tricolor' is sworn in as a witness, bacchu kadu sworn with tiranga national flag | Video : 'तिरंग्याला' साक्षी मानून शपथ घेतो की.... आमदारांमधला वेगळाच भिडू

Video : 'तिरंग्याला' साक्षी मानून शपथ घेतो की.... आमदारांमधला वेगळाच भिडू

Next

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्याला पूर्णविराम मिळाल्यानंतर 14 व्या विधानसभेचं कामकाज आजपासून सुरु झालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश दिल्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून सभागृहात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनं कामाला सुरुवात झाली. यावेळी, पहिल्यांदाच आमदारकीची शपथ घेणारे युवक आमदार भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. तर, रोहित पवार यांच्या शपथविधीन सर्वांचंच लक्ष वेधलं. रोहित पवारांप्रमाणेच अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनीही हटके शपथ घेतली. त्यामुळे, त्यांच्याही शपथविधीचं सर्वत्र, सोशल मीडियातून कौतुक होत आहे. 

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ दिली. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही. तर, कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून कालच शपथ घेतली होती. यंदाच्या 14 व्या विधानसभेत अनेक नवयुवक आमदार म्हणून पोहोचले आहेत. त्यामध्ये, आदित्य ठाकरे, रोहित पवार, संदीप क्षीरसागर हेही आहेत. या तिघांनीही आपले वेगळेपण आज विधानभवनात सिद्ध केलंय. रोहित यांनी शपथ घेतेवेळी आईचे नाव घेतले, तर आदित्य यांनी शपथविधीनंतर माजी मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणीवीस यांच्याकडे जाऊन हातमिळवणी केली. संदीप यांनी विधानभवनातून बाहेर येताना, कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. विधानभवनातील शपथविधी सोहळ्यात प्रत्येकाने देवाला साक्षी मानून शपथ घेतली, तर शपथेशेवटी जय, शिवराय, जय, भीम, जय बिरसा, जय श्रीराम म्हणत सांगता केली. 

अचलपूर मतदारसंघातून 4 वेळा अपक्ष म्हणून निवडून येणारे आमदार आणि प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आमदारकीची शपथ घेताना , मी ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू तिरंग्याला साक्ष मानून शपथ घेतो की, असे म्हणत आपला शपथविधी पूर्ण केला. विधानभवनात आज शपथ घेणाऱ्या 285 आमदारांपैकी बच्चू कडू एकमेव आमदार आहेत, ज्यांनी तिरंग्याला साक्ष मानून शपथ घेतली. इतर सर्वचआमदारांनी शपथपत्रतील मजकूराप्रमाणे देवाला, ईश्वाराला, अल्लाला साक्षी मानून शपथ घेतली आहे. बच्चू यांच्या या शपथविधीची चर्चा रंगली असून तळमळीचा आणि देशभक्त नेता म्हणून त्यांची वाहवा होत आहे.

Web Title: Video : The 'tricolor' is sworn in as a witness, bacchu kadu sworn with tiranga national flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.