ठळक मुद्देया फेसबुक लाईव्हमध्ये सुळे यांनी माझ्या आयुष्यात असं चित्र प्रथमच पाहिलं असून समुद्रात आल्यासारखंच वाटत आहे म्हटलं आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमधून घरी जात असताना सुप्रिया सुळे यांनी काल फेसबुक  लाईव्ह  केलं होतं. या फेसबुक लाईव्हमध्ये सुळे यांनी माझ्या आयुष्यात असं चित्र प्रथमच पाहिलं असून समुद्रात आल्यासारखंच वाटत आहे म्हटलं आहे. तसेच या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दक्षिण मुंबईमध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी तुंबल्याचं पहिल्याचं म्हटलं आहे. काल दक्षिण मुंबई धुव्वाधार पाऊस आणि वादळी वारा होता. रस्त्यावर पाणीच पाणी तुंबलं होतं, त्यामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. या मुसळधार पावसात देखील भक्कम पाय रोवून सेवा देणाऱ्या पोलिसाचा फोटो सुळे यांनी ट्विटरवर शेअर करत आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच...तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट...असं म्हणून मुंबई पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

 

 

मुसळधार पावसाच्या सरी, सोसाटय़ाचा वारा आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे मुंबईत चहूबाजूला पाणीच पाणी दिसत होते. रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता. कालची परिस्थिती पाहून मुंबईकरांना ‘२६ जुलै’च्या पुरमय परिस्थितीची आठवण झाली. मुसळधार पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली. मात्र, बुधवारी त्याचा नूरच वेगळा होता. दक्षिण मुंबईमधील नरिमन पॉइंट, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव आदी ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. मंत्रालय परिसरचं नव्हे तर गिरगाव चौपाटीलगतच्या सुभाषचंद्र बोस मार्गावर प्रचंड पाणी साचले. ग्रॅन्ट रोड, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई सेंट्रल, सातरस्ता, लालबाग, परळ, हिंदमाता, दादर, माहीम, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, चुनाभाट्टी, मानखुर्द यांसह विविध परिसर जलमय झाले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले, मोठं मोठी झाडं कोसळली आणि झाडं गाड्यांवर कोसळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र या अशा वादळी पावसाच्या परिस्थितीमध्येही मुंबई पोलीस ऑन ड्युटी होते. त्यांच्या याच खंबीर जिद्दीने मुंबईकरांना सेवा देण्यासाठी भक्कम पाय रोवलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा दाखवणारा एक फोटो व्हायरल होत आहे. पिवळ्या रंगाचा रेनकोट घालून रस्त्यावरील वाहनांवर लक्ष ठेवणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाचा पाठमागून काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर हजारोच्या संख्येने शेअर केला जात आहे. या फोटोची दाखल सुप्रिया सुळे यांनीही घेतली आणि हा फोटो ट्विट करत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. 

तसेच आज चौपाटीबाहेर आलेला कचरा साफ करणाऱ्या सफाई कामगारांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत त्यांच्या भरपावसात सुरु असलेल्या साफसफाईच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांचे मनोधैर्य वाढवले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

अर्णब गोस्वामीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार, अटक करण्याची मागणी

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेली महिला, प्रियकराने गोळ्या घालून केली हत्या

 

संगमनेरात बजरंग दलाचे पदाधिकारी ताब्यात

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

अविनाश जाधव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: Salute Mumbai Police! Supriya Sule shared a photo of the police serving in the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.