Video - संतापजनक! लोकांच्या जीवाशी खेळ; फळांना लावलं उंदीर मारण्याचं औषध, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:48 IST2026-02-25T15:47:51+5:302026-02-25T15:48:14+5:30

मुंबईच्या मालाडमध्ये फळविक्रीशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Video mumbai malad fruit seller in found applying rat poison on fruits arrested | Video - संतापजनक! लोकांच्या जीवाशी खेळ; फळांना लावलं उंदीर मारण्याचं औषध, दोघांना अटक

Video - संतापजनक! लोकांच्या जीवाशी खेळ; फळांना लावलं उंदीर मारण्याचं औषध, दोघांना अटक

मुंबईच्या मालाडमध्ये फळविक्रीशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विक्रेते फळांवर उंदीर मारण्याचं औषध लावून ती बाजारात विकत असल्याचा आरोप आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुकान सील केलं असून दोन आरोपींना अटक केली आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

स्थानिक नागरिक कुणाल साळुंके यांनी पोलिसांत लेखी तक्रार दाखल केल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आलं. फळांना उंदरांपासून वाचवण्याच्या नावाखाली दोन फळविक्रेते त्यावर विषारी पदार्थ लावत असल्याचं तक्रारीत म्हटलं होतं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ पुरावा म्हणून पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.


मालाड पोलीस ठाण्याच्या पथकाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी जाऊन तपास केला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी कबूल केलं की, ते फळांना उंदरांपासून वाचवण्यासाठी त्यावर उंदीर मारण्याचं औषध लावत असत. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, असं कृत्य केवळ बेकायदेशीरच नाही, तर सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक देखील आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी अशी आहेत. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचं दुकान सील करून पुढील तपास सुरू केला आहे. खाद्यपदार्थांबाबत असा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तपासात आणखी काही तथ्ये समोर आल्यास संबंधित विभागांनाही कारवाईसाठी सूचित केले जाईल असंही म्हटलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

Web Title : मलाड: फल विक्रेताओ ने लगाया चूहे मारने का जहर; दो गिरफ्तार

Web Summary : मुंबई के मलाड में फल विक्रेताओं को फलों पर चूहे मारने का जहर लगाने के आरोप में गिरफ्तार किया गया, जिससे स्वास्थ्य को गंभीर खतरा है। शिकायत के बाद पुलिस ने दुकान सील कर दी और जांच शुरू कर दी। आरोपियों ने दावा किया कि वे फलों को चूहों से बचा रहे थे।

Web Title : Malad: Fruit vendors apply rat poison; two arrested for endangering lives.

Web Summary : In Mumbai's Malad, fruit vendors were arrested for applying rat poison to fruits, posing a severe health risk. Following a complaint, police sealed the shop and initiated an investigation. The accused claimed they were protecting the fruits from rats.