Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:20 PM2022-01-20T15:20:30+5:302022-01-20T15:27:35+5:30

आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या अन्नाच्या शोधात एका रानावनात आलेलं काळवीट दिसत आहे. तर, काळवीट हे आपलं अन्न असल्याने त्या सावजाची शिकार करण्यासाठी एक बिबट्या हळूहळू पावलं टाकून सावधगिरीने शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत

Video : Hunting video shared by Minister Jitendra Awhad of leopard | Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting

Video : अन् बिबट्यानं डाव साधला, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी दाखवली Amazing Hunting

Next

मुंबई - वन्यजीव प्राण्याच्या जीवनाची साखळी असते. लहानशा किड्यांपासून ते वाघांपर्यंत हे प्राणी एकमेकांवर उजजिवीकेसाठी अवलंबून असतात. वाघ, बिबट्या या प्राण्यांना आपलं पोट भरण्यासाठी शिकाराच्या शोधात जंगलात, रानावनात फिरावं लागतं. सावज गाठण्यासाठी दबा धरुन बसावं लागतं. तर, या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी हरीण, काळवीट, गाय, बैल यांसारखे प्राणी सावध असतात. मात्र, तरीही निसर्गाचे हे चक्र चालते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असाच एक अमेझिंग हंटींगचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या अन्नाच्या शोधात एका रानावनात आलेलं काळवीट दिसत आहे. तर, काळवीट हे आपलं अन्न असल्याने त्या सावजाची शिकार करण्यासाठी एक बिबट्या हळूहळू पावलं टाकून सावधगिरीने शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका झाडाजवळ उभा राहून खात असलेल्या काळविटाला पाहत बिबट्या त्याच्याकडे हळूवार धाव घेतो. लपत-लपत झाडाच्यादिशेने आगेचूक करतो. या काळविटालाही याची भनक लागते. त्यामुळे, तेही इकडे-तिकडे पाहत चरताना दिसून येत आहे. 


दबा धरुन बसलेला बिबट्या अखेर झाडाच्या आड जाऊन काळविटावर झडप घालतो. त्याक्षणी काळवीट उंच ढांगा टाकत तेथून पळ काढताना दिसत आहे. मात्र, पळ काढलेल्या काळविटाचा पाठलाग करत बिबट्या त्यास आपल्या जबड्यात ओढतोच... असे हा निसर्गचक्राचा व्हिडिओ मंत्री आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, Amazing #Hunting असे कॅप्शनही त्यांनी दिलंय. 57 सेकंदाच्या या व्हिडिओला 5 तासांत 8.2 हजार व्ह्यूज ट्विटरवर मिळाले आहेत.
 

Web Title: Video : Hunting video shared by Minister Jitendra Awhad of leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.