Join us

Video: "तेरे नाल ही नचणा वे...."; अमृता फडणवीसांची रियाज अलीसोबत रील, सोशल मीडियावर तुफान चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 12:01 IST

अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर रिल देखील बनवली आहे.

मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं पंजाबी गाणं रिलीज झाले आहे. अमृता फडणवीस यांनी गायनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अमृता फडणवीस यांनी 'मूड बना लेया वे' हे नवं पंजाबी गाणं आणले आहे. सध्या या गाण्याची चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांची या गाण्याला पसंती मिळत आहे. 

‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!!’ असे अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर आता अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर रिल देखील बनवली आहे. रील स्टार रियाज अली याच्यासोबत त्यांनी व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. 

अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत याआधी 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचं गाणं प्रदर्शित झालं होतं. "जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही!" असं या गाण्यात म्हटलं होतं. तसेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त ‘ये नयन डरे डरे’ हे गाणं देखील गायलं होतं.

दिवाळीच्यानिमित्त त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. "जय लक्ष्मी माता" असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या गाण्याबाबत माहिती दिली होती. "दिवाळी आणि लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी लक्ष्मी देवीची आरती ऐका आणि भक्तीत तल्लीन व्हा! प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..." असं अमृता यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. अमृता यांच्या गाण्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून कौतुकाचा वर्षाव केला होता. काहींनी गाणं अतिशय सुंदर असल्याचं म्हटलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अमृता फडणवीसइन्स्टाग्रामसोशल मीडिया