उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:28 PM2021-06-21T18:28:26+5:302021-06-21T18:29:30+5:30

प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी शिवसेना व मुख्यमंत्री खंबीरपणे आहेत. मात्र, केंद्रीय यंत्रणांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करताना राऊत यांनी मी महाराभारतला संजय आहे, असं म्हटलं होतं.

Is Uddhav Thackeray Dhritarashtra? BJP made fun of Sanjay Raut in the video | उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली

उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली

Next
ठळक मुद्देआमचे केसं पांढरे झालेत, आम्ही महाभारताची जी उदाहरणं दिली आहेत, त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, आणि लक्षात घ्या माझं नाव संजय आहे, असं खासदार संजय राऊत म्हणत असल्याचा एक व्हिडिओ मुंबई भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे

मुंबई - प्रताप सरनाईक यांच्या पत्रात, भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन नाहक त्रास दिला जातोय याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या पत्राचं सार आपल्या लक्षात आला असेलच, प्रताप सरकारनं शिवसेनेच्या कुटुंबाचे महत्वाचे सदस्य आहेत आणि आमचं शरीर व काळीज दोन्ही वाघाचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठाम उभा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. यावेळी, आम्ही महाभारतातील योद्धे असल्याचंही ते म्हणाले.  

प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी शिवसेना व मुख्यमंत्री खंबीरपणे आहेत. मात्र, केंद्रीय यंत्रणांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करताना राऊत यांनी मी महाराभारतला संजय आहे, असं म्हटलं होतं. त्यावरुन, भाजपाने शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. भाजपने व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. 


आमचे केसं पांढरे झालेत, आम्ही महाभारताची जी उदाहरणं दिली आहेत, त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, आणि लक्षात घ्या माझं नाव संजय आहे, असं खासदार संजय राऊत म्हणत असल्याचा एक व्हिडिओ मुंबई भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच, या व्हिडिओत ठाकरे सरकार म्हणजे कौरवांची सेना, महाभारतातील उदाहरण देताना संजय राऊत म्हणाले मी संजय... संजय कौरवांच्या सेनेत होता, असेही व्हिडिओतून सांगण्यात आलं आहे. 

भाजपाने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर नेम धरला आहे. संजय राऊत यांना विश्वप्रवक्ता म्हणून त्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. चला, बरं झालं संजय राऊत यांनी स्वतः मान्य केलं की ते महाभारतातले संजय आहेत... लोकांनी या वक्तव्याचा असा अर्थ काढावा का, की शिवसेना म्हणजे कौरवांची टोळी आणि उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत?, असेही भाजपने म्हटले आहे.   

'योग दिना'वरुन साधला निशाणा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योगा अॅपच लॉंचिंग केलं. भाजपकडून देशभरात विविध योगा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. योग दिनाचं औचित्य साधून तुम्ही विरोधकांना कोणता योग सुचवाल?, असं संजय राऊत यांना विचारलं असता. संजय राऊत यांनी जाता जाता क्षणार्धात... 'शवासन' असं एका शब्दात उत्तर देऊन भाजपला टोला लगावला.

महाविकास आघाडी देशासाठी उदाहरण

आघाडी कशी असावी याचं महाविकास आघाडी हे संपूर्ण देशासाठी उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडी ही आदर्श समन्वयाचं उदाहरण आहे. महाराष्ट्रात सत्तेचा उत्तम फॉर्म्युला सुरू आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम समन्वय साधून सरकार चालवत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Is Uddhav Thackeray Dhritarashtra? BJP made fun of Sanjay Raut in the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app