Uddhav Thackeray: मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 18:14 IST2022-03-24T17:52:28+5:302022-03-24T18:14:53+5:30
1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले.

Uddhav Thackeray: मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई - मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधाला. तसेच, मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार केला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीही मुंबईत हक्काच घर असणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. आता त्या कष्टकऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बीडीडी चाळ आणि मुंबईतील श्रमिक वर्गांसाठीच्या घरांसंदर्भात विधानसभेत चर्चा केली. यावेळी, धारावीच्या पुनर्विकासाचं विचाराधीन आहे. पण, केंद्र सरकारच्या काही नियमावली आणि जागांचा ताबा यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
आमदारांसाठी 300 घरे बांधणार
सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत केली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ही घरं देण्यात येतील. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं.