दोन तरुणींनी घेतली रिक्षातून उडी

By Admin | Updated: March 3, 2015 02:25 IST2015-03-03T02:25:11+5:302015-03-03T02:25:11+5:30

अपहरणाच्या भीतीने स्वप्नाली लाड हिने रिक्षातून उडी घेतल्याला काही महिनेच झाले असताना रविवारी रात्री ठाण्यात पुन्हा तशीच घटना घडली.

Two women took the helm from the rickshaw | दोन तरुणींनी घेतली रिक्षातून उडी

दोन तरुणींनी घेतली रिक्षातून उडी

ठाणे : अपहरणाच्या भीतीने स्वप्नाली लाड हिने रिक्षातून उडी घेतल्याला काही महिनेच झाले असताना रविवारी रात्री ठाण्यात पुन्हा तशीच घटना घडली.
रत्नागिरीहून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमाला आलेल्या दोन तरु णींनी रिक्षाचालकाच्या संशयास्पद हालचालींमुळे रिक्षातून उडी घेतली. ही घटना कॅडबरी जंक्शन येथे घडली. त्या दोघींचीही प्रकृती स्थिर असून, संशयित रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे रेखाचित्रही तयार करण्यात आले आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली आहेत. भिवंडीतील नातेवाइकांकडे जाण्यास दोघीही रात्री ९ला ठाण्यात उतरल्या. नौपाड्यातून त्यांची रिक्षा निघाल्यानंतर रिक्षाचालक त्यांच्याकडे आरशातून पाहात अश्लील हावभाव करीत होता.
त्यामुळे त्या भेदरल्या. त्यांनी रिक्षा थांबवायला सांगितली. पण तोपर्यंत रिक्षा नितीन कंपनीजवळील उड्डाणपुलावर पोहोचली होती. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्यांनी मागचा पुढचा विचार न करता रिक्षातून कॅडबरी कंपनीजवळ उडी घेतली.
रिक्षा वेगात असल्याने त्या फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. दोघींच्याही हाताला व डोक्याला मार लागल्याचे त्या महिलेला दिसले. तिने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. विनयभंग, अपहरण
पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुमन चव्हाण यांनी
दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Two women took the helm from the rickshaw