उद्या, परवा प्रवाशांची परीक्षा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:33 PM2022-08-19T14:33:12+5:302022-08-19T14:33:34+5:30

Megablock : ब्लॉक कालावधीत अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आलेल्या आहेत. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवली जाईल.

Two days megablock on both lines of Central Railway | उद्या, परवा प्रवाशांची परीक्षा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक

उद्या, परवा प्रवाशांची परीक्षा; मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर दोन दिवस मेगाब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर विविध डागडुजीची कामे करण्यासाठी येत्या शनिवारी-रविवारी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. 

ब्लॉक कालावधीत अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात आलेल्या आहेत. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवली जाईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे या गाडीला दुहेरी थांबा दिला जाईल आणि रोहा येथे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

अमृतसर- सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस आणि हावडा-सीएसएमटी नागपूर मार्गे मेल, माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

हार्बरवर काय?
- सीएसएमटी ते  चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर  रविवारी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत 
- ब्लॉक दरम्यान सीएसएमटी मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी  ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरिता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

मेगाब्लॉक कुठून कुठे? 
     भायखळा  ते माटुंगा अप आणि डाऊन जलद मार्गावर 
    शनिवारी रात्री ११.३०  ते रविवारी पहाटे ४.३०  वाजेपर्यंत 
    रविवारी सकाळी १२.४०  ते संध्याकाळी ०५.४० वाजेपर्यंत 
काय होणार?
     ब्लॉकदरम्यान रविवारी सीएसएमटी येथून सकाळी ०५.२० वाजता  सुटणारी डाऊन जलद मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा दरम्यानच्या धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. 
    ठाणे येथून शनिवारी रात्री १०.५८ आणि ११.१५ वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.
 

Web Title: Two days megablock on both lines of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.