'आज आई नाही याची खंत'... शरद पवारांचं नाव घेऊन जयंत पाटलांची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 19:40 IST2019-11-28T19:39:29+5:302019-11-28T19:40:51+5:30
जयंत पाटील यांना शपथ घेताना आपल्या आईची आठवण झाली.

'आज आई नाही याची खंत'... शरद पवारांचं नाव घेऊन जयंत पाटलांची शपथ
मुंबई - 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' असे म्हणत महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. त्यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंसह या सर्वांना शपथ दिली. त्यामध्ये प्रत्येकाची शपथ ही वेगळीच होती. मात्र, जयंत पाटील यांनी आपल्या आईचे नाव घेऊन शपथ घेताना, शरद पवारांना वंदन केलं.
जयंत पाटील यांना शपथ घेताना आपल्या आईची आठवण झाली. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मला दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. माझ्या यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. 'आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल.'', असे भावनिक ट्विट जयंत पाटील यांनी केलंय.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल. शेतकरी, युवा व महिला वर्गाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही योजनांची आखणी व अंमलबजावणी करू. निर्णय घेताना जनता व सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. केवळ आताच्याच नाही तर येणाऱ्या पिढयांना देखील आनंदाने या राज्यात जगता येईल, असे राज्य उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. समृद्ध महाराष्ट्राच्या सोबतच सुखी आणि आनंदी महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करू.
महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे. ती असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथे कुठे असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल.#MaharashtraVikasAghadipic.twitter.com/TZvFc9Xz4f
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 28, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या लाखो कार्यकर्त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो. हा विजय या तिन्ही पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि मी तो त्यांनाच समर्पित करू इच्छितो.#MaharashtraVikasAghadi#ShivajiParkpic.twitter.com/RE2AZ6AW5A
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 28, 2019