three passenger falls from mumbai local near kurla sion | कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जखमी
कुर्ला-सायनदरम्यान लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जखमी

मुंबई - मध्य रेल्वेवरील कुर्ला-सायन रेल्वेस्थानकांदरम्यान मंगळवारी (18 सप्टेंबर) रात्री लोकलमधून तीन जण खाली पडल्याची घटना घडली होती. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. गर्दीमुळे तोल जाऊन ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. 

मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास काही जण तोल जाऊन रुळावर पडल्याची माहिती जीआरपीला मिळाली होती. कुर्ला-सायन रेल्वेस्थानकांदरम्यान रुळावर पडलेल्या तिघांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


Web Title: three passenger falls from mumbai local near kurla sion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.