तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार, सहा हजार खाटांच्या क्षमतेची तीन जम्बो केंद्रे उभारणार - महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:30 AM2021-05-14T10:30:24+5:302021-05-14T10:32:11+5:30

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने पाचशे खाटांचे कोविड केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.

Three jumbo centers with a capacity of 6,000 beds to be set up to stop third corona wave | तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी तयार, सहा हजार खाटांच्या क्षमतेची तीन जम्बो केंद्रे उभारणार - महापालिका

संग्रहित छायाचित्र

Next

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट जुलै ते सप्टेंबर या कालावधीत येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र दुसऱ्या लाटेच्या अनुभवावरून नवीन येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. त्यानुसार भविष्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी पालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. तसेच गोरेगाव येथील जम्बो कोविड केंद्रात दीड हजार खाटा वाढविण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहर, पूर्व आणि पश्चिम येथे प्रत्येकी दोन हजार खाटांच्या क्षमतेची जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात येत आहेत. तर महालक्ष्मी रेसकोर्स येथील जम्बो कोविड केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यात येत आहे.  तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका असल्याने पाचशे खाटांचे कोविड केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासकीय यंत्रणा तयार
ऑक्सिजन
पालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये सोळा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. 
याद्वारे दररोज ४५ मेट्रिक टन ऑक्‍सिजन उपलब्ध होणार आहे. तसेच दोन हजार लीटर प्रतिमिनिट आणि तीन हजार लीटर प्रतिमिनिट ऑक्सिजन उत्पादन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 
तर रुग्णालयांना १० लीटर प्रतिमिनिट क्षमतेची सुमारे १,२०० प्राणवायू कॉन्सेट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कोविड काळजी केंद्रे
सात जम्बो केंद्रे आहेत. तसेच मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक केंद्र आहे. त्याचबरोबर मालाड, कांजूरमार्ग आणि शहरात प्रत्येकी एक कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे.

ऑक्सिजन खाटा
मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण १२ हजार ७४८ खाटा आहेत. गोरेगाव नेस्को केंद्रात एक हजार, महालक्ष्मी रेसकोर्सवरील जम्बो केंद्र दोनशे, तीन जम्बो केंद्रांमध्ये ७० टक्के ऑक्सिजन खाटा वाढविण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तीन जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन हजार खाटांची सोय असणार आहे. तसेच यापैकी ७० टक्के ऑक्सिजन खाटा असणार आहेत. ऑक्सिजन प्लांटही उभारण्यात येणार आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)

औषधे २,००,००० रेमडेसिविर महापालिकेने खरेदी केली आहेत.
कोठे किती खाटा वाढविण्याची तयारी -
१,५०० गोरेगाव नेस्को केंद्र
९०० महालक्ष्मी रेसकोर्स केंद्र
२,००० प्रत्येकी तीन जम्बो कोविड केंद्रे
 

Web Title: Three jumbo centers with a capacity of 6,000 beds to be set up to stop third corona wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.