तिसऱ्या टप्प्याचे आकडे ४ दिवसांनी झाले अपडेट; चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 13:48 IST2024-05-12T13:47:47+5:302024-05-12T13:48:32+5:30
मागील काही दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा शनिवारी शांत झाल्या.

तिसऱ्या टप्प्याचे आकडे ४ दिवसांनी झाले अपडेट; चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ व ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागांसह १० राज्यांतील ९६ मतदारसंघात सोमवारी (दि. १३) मतदान होणार आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा शनिवारी शांत झाल्या.
चौथ्या टप्प्यात राज्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, अहमदनगर, शिर्डी व बीड शिरूर या ११ मतदारसंघांत शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. प्रचाराच्या निमित्ताने राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या सभा झाल्या.
तिसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठी ७ मे रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केली. त्यानुसार देशभरात सरासरी ६५.६८%, तर राज्यात ६३.५५% मतदान झाले.
राज्य (जागा) ११ मे रोजीचे अंतिम आकडे
आसाम (४)    ८५.४५    
बिहार (५)    ५९.१५    
छत्तीसगड (७)    ७१.९८    
दा.न.हवेली व दीव(२)    ७१.३१
कर्नाटक (१४)    ७१.८४
गोवा (२)    ७६.०६
गुजरात (२५)    ६०.१३
मध्य प्रदेश (९)    ६६.७५
महाराष्ट्र (११)    ६३.५५
उत्तर प्रदेश (१०)    ५७.५५
पश्चिम बंगाल (४)    ७७.५३
एकूण (९३)    ६५.६८
मतदार संघ ११ मे रोजीचे अंतिम आकडे
बारामती     ५९.५०
हातकणंगले     ७१.११
कोल्हापूर     ७१.५९
लातूर    ६२.५९
माढा     ६३.६५
उस्मानाबाद    ६३.८८
रायगड     ६०.५१
रत्नागिरी-सिंधुदुर्ग     ६२.५२
सांगली     ६२.२७
सातारा     ६३.१६
सोलापूर     ५९.१९
एकूण (११)    ६३.५५