खडा पहारा देऊनही हाती काहीच नाही!

By Admin | Updated: August 31, 2015 02:12 IST2015-08-31T02:12:07+5:302015-08-31T02:12:07+5:30

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय या आरोपींना पेण-खोपोली राज्यमार्गावरील गागोदे खिंडीत ज्या ठिकाणी येथील

There is no hand on the park! | खडा पहारा देऊनही हाती काहीच नाही!

खडा पहारा देऊनही हाती काहीच नाही!

पेण : शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना व ड्रायव्हर श्याम राय या आरोपींना पेण-खोपोली राज्यमार्गावरील गागोदे खिंडीत ज्या ठिकाणी येथील जंगलात शीनाच्या देहाचा सांगाडा मुंबई पोलिसांनी हस्तगत केला होता तेथे आणले होते. त्या जागेची ओळख पटण्यासाठी व स्पॉट पंचनाम्यासाठी तपासीय पोलीस अधिकारी आरोपींना घेवून सुमो गाडीने आले होते. या ठिकाणी सतत तीन दिवस खडा पहारा देणाऱ्या देशातील विविध न्यूज चॅनेलच्या ब्रॉडकास्टिंग करणाऱ्या व्हॅन व माध्यमाच्या प्रतिनिधींचा पडलेला खिंडीतील गराडा पाहून तपासीय अधिकाऱ्यांनी ती गाडी क्षणार्धात भरधाव वेगाने घटनास्थळापासून पेणकडे नेल्याने माध्यमांच्या हाती काहीच लागले नाही.
रविवारी सायंकाळी ६.०० वाजता पोलीस अधिकारी खोपोली मार्गे गागोदे खिंडीकडे आरोपींना घेवून आले. सुमो गाडीत आरोपी होते. मात्र पोलीसांनी गाडीच्या काचांना आतून न्यूज पेपर चिटकवले होते. गाडीत आरोपी असल्याची माध्यमांच्या प्रतिनिधींची खात्री पटून त्या गाडीचे फोटो व इन कॅमेरा चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरे सज्ज होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी सुमो गाडी क्षणाचाही विलंब न लावता भरधाव वेगाने पेणच्या दिशेने पळविली. ही गाडी पेण पोलीस ठाणे येथे जाणार म्हणून माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाडीचा पाठलागसुध्दा केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अधिकारी वर्गाने ही गाडी कुठे नेली याचा थांगपत्तासुध्दा लागू दिला नाही. गाडी भरधाव वेगाने निघून गेल्याने गागोदे खिंडीत होणारा स्पॉट पंचनामा रविवारी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होऊ शकला नाही. (वार्ताहर)

Web Title: There is no hand on the park!