‘...तर कैद्यांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था करा’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:03 AM2020-03-15T05:03:05+5:302020-03-15T05:04:54+5:30

ऑर्थर रोड कारागृहातील सर्दी, फ्लूसारख्या तक्रारी असलेल्या कैद्यांना वेगळे ठेवावे. गरजेनुसार कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करावे. जे. जे. रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्येही अशा रुग्णांच्या उपचारांबाबत पर्यायाची चाचपणी करावी.

'... then arrange to keep the prisoners separate' | ‘...तर कैद्यांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था करा’

‘...तर कैद्यांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था करा’

Next

मुंबई : कारागृहांमधील कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाण वाढवावे. आॅर्थर रोड कारागृहातील कैद्यांची मोठी संख्या पाहता तेथे संशयित रुग्ण कैदी आढळल्यास त्याला वेगळे ठेवावे. नागपूरच्या रुग्णालयातून पळालेल्या कोरोना संशयित रुग्णाचा तत्काळ शोध घेऊन त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम राबवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.
आॅर्थर रोड कारागृहातील सर्दी, फ्लूसारख्या तक्रारी असलेल्या कैद्यांना वेगळे ठेवावे. गरजेनुसार कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करावे. जे. जे. रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमध्येही अशा रुग्णांच्या उपचारांबाबत पर्यायाची चाचपणी करावी. सोशल मीडियावरील अफवांबाबत सायबर पोलिसांनी तक्रारी दाखल करून कठोर कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री देशमुख यांनी दिले.

आदेश न मिळाल्याने सकाळी चित्रपटगृहे राहिली सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश न मिळाल्याने शनिवारी सकाळी मुंबईतील काही चित्रपटगृहे सुरू होती. दुपारनंतर ती बंद करण्यात आली. आदेश मिळत नाही, तोपर्यंत चित्रपटगृहे सुरू ठेवणार, अशी भूमिका काही चित्रपटगृह चालकांनी घेतली, परंतु असोसिएशनने त्यांच्याशी संपर्क साधून चित्रपटगृहे बंद करण्यास सांगितले, असे सिनेमा ओनर्स अँड एक्सिबिटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले.

Web Title: '... then arrange to keep the prisoners separate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.