CoronaVirus News: Breaking- 'त्या' परीक्षा सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार- उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:20 PM2020-05-08T14:20:28+5:302020-05-08T14:46:07+5:30

गेल्या वर्षातील ५० टक्के कामगिरी गृहीत धरली जाणार असून, उर्वरित ५० टक्क्यांच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाणार आहे.

then all other students will get admission in the next class- Uday Samant | CoronaVirus News: Breaking- 'त्या' परीक्षा सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार- उदय सामंत

CoronaVirus News: Breaking- 'त्या' परीक्षा सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार- उदय सामंत

Next
ठळक मुद्देइतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.  प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची गेल्या वर्षातील ५० टक्के कामगिरी गृहीत धरली जाणार असून, उर्वरित ५० टक्क्यांच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी नापास झालेल्या विषयांत १२० दिवसांत परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

मुंबईः अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गेल्या वर्षातील कामगिरीनुसार युजीसीच्या नियमावलीप्रमाणे त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची गेल्या वर्षातील ५० टक्के कामगिरी गृहीत धरली जाणार असून, उर्वरित ५० टक्क्यांच्या कामगिरीनुसार विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी नापास झालेल्या विषयांत १२० दिवसांत परीक्षा देऊन ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांचाही विचार करून त्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे, मात्र त्यांना ही पुढील वर्षाच्या १२० दिवसांत आधीच्या एटीकेटी क्लीअर कराव्या लागणार आहेत. यासाठी ५० टक्के मागील वर्षीचा परफॉर्मन्स आणि ५० टक्के सध्याच्या सत्रातील परफॉर्मन्स लक्षात घेऊन श्रेणी दिली जाईल, गुण दिले जातील आणि पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल.


अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत, अनेक विद्यार्थी शैक्षणिक संकुलापासून दूर आहेत हे लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून अंतिम वर्षाच्या, अंतिम सत्राच्या परीक्षा सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने या महाविद्यालयीन व विद्यापीठांच्या परीक्षांबाबत घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्याना पुढील वर्गात गेल्यानंतर आपली श्रेणी कमी आहे, असे वाटले तर ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय त्यांना पुढील वर्षी उपलब्ध असणार आहे. त्याचे नियोजन विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे असणार आहे. 

नापास होणाऱ्या विद्यार्थ्याना ही यंदा पुढील वर्गात जाण्याची संधी उपलब्ध होईल, मात्र पुढील वर्गात गेल्यानंतर पुढच्या वर्षी त्याना ते नापास झालेल्या विषयांची परीक्षा विद्यापीठाच्या नियोजनाप्रमाणे द्यावी लागणार आहे. शेवटच्या वर्षाच्या निकालावर विद्यार्थ्यांचे करिअर अवलंबून असल्याने अंतिम  वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार असून त्यामध्ये सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षांच्या बाबतीत येत्या ८ दिवसांत जाहीर करण्यात येईल.

जिल्हा स्तरावरील सेन्टर्स तालुकास्तरावर घेता येतील का याचे नियोजन करण्याचा प्रयत्न सीईटी परीक्षेसाठी करण्यात येईल. लॉकडाऊनच्या ४५ दिवसांची विद्यार्थ्यांची  हजेरी लागणार आहे. विद्यार्थ्याना शंका असल्यास विद्यापीठांनी विद्यार्थायंचे शंका निरसन करणारे सेल जिल्ह्यात उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी पालकांसाठी समुपदेशन केंद्र ही सुरु करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहेत. स्वायत्त विद्यापीठांना ही युजीसीच्या निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल; रेल्वे मंत्र्यांना दिल्या सूचना

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

Read in English

Web Title: then all other students will get admission in the next class- Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.