पालिका सभागृहात आता आसनांची संख्या वाढणार; सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:56 IST2026-02-14T10:55:31+5:302026-02-14T10:56:22+5:30

२०२२ पर्यंत तरी २२७ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवक, महापालिका चिटणीस विभागाचे संबंधित अधिकारी, पत्रकार हे कसेतरी दाटीवाटीने आसनावर बसून काम करीत होते.

The number of seats in the BMC Municipal Hall will now increase; Decision taken in the meeting of all-party group leaders | पालिका सभागृहात आता आसनांची संख्या वाढणार; सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय

पालिका सभागृहात आता आसनांची संख्या वाढणार; सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय

मुंबई - महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहात काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी बसायला जागा नसल्याचे कारण देत घातलेल्या गोंधळाची दखल शुक्रवारी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली. या वेळी महापालिका सभागृहातील उपलब्ध जागेत काही बदल, सुधारणा करून नगरसेवकांना बसण्यासाठी आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई महापालिकेची हेरिटेज इमारत तळमजला अधिक दोन मजली आहे. या इमारतीत मर्यादित जागा आहे. काळाच्या ओघात नगरसेवकांची संख्या वाढत गेली. मात्र सभागृहातील आसन क्षमता मर्यादित राहिली. काही वर्षांपूर्वी पालिका सभागृहाला लागलेल्या आगीनंतर सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, आसन क्षमता काही वाढवण्यात आली नाही. २०२२ पर्यंत तरी २२७ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवक, महापालिका चिटणीस विभागाचे संबंधित अधिकारी, पत्रकार हे कसेतरी दाटीवाटीने आसनावर बसून काम करीत होते. यंदा स्वीकृत नगरसेवकांची संख्य १० झाली आहे. त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण 
झाला आहे. 

महापौरांच्या दालनात शुक्रवारी उद्धवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, शिंदेसेनेचे गटनेते अमेय घोले आदी गटनेते, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि आयुक्त भूषण गगराणी यांची बैठक पार पडली. 

बाहेरची जागा आता सभागृहासाठी घेणार
सभागृहातील राष्ट्रपुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी ठेवणे, सभागृहाच्या बाहेरील जागा सभागृहात समाविष्ट करणे, साउंड सिस्टिम ठेवण्यात येणाऱ्या जागेचा कमीत कमी वापर करणे आदी बाबींचा विचार करण्यात आला. 

कॉर्डलेस माइकची सुविधा
सभागृहातील लटकते माइक वापरण्याची पद्धत बंद करून प्रत्येक नगरसेवकाच्या बाकांवर कॉर्डलेस माइकची सुविधा उपलब्ध करण्याबाबतही चर्चा यावेळी 
करण्यात आली.

काँग्रेसच्या नगरसेवकांनी केले होते आंदोलन
महापौर निवडणुकीच्या वेळी अपुऱ्या आसन क्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. निवडणुकीच्या वेळी काँग्रेस नगरसेवकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी महापौरांच्या आसनाच्या समोरील जमिनीवर बसून आंदोलन केले होते.

Web Title : मुंबई नगर निगम सभागार में अब बढ़ेगी बैठने की क्षमता

Web Summary : सीटों को लेकर कांग्रेस के विरोध के बाद, मुंबई नगर निगम सभागार क्षमता बढ़ाएगा। मूर्तियों का स्थानांतरण, बाहरी स्थान का उपयोग और कॉर्डलेस माइक लगाना शामिल है। उद्देश्य सभी पार्षदों को आराम से समायोजित करना है।

Web Title : Mumbai Municipal Corporation to Increase Seating Capacity in Hall

Web Summary : Following Congress protests over seating, Mumbai's civic hall will expand capacity. Modifications include relocating statues, using external space, and installing cordless mics. The aim is to accommodate all corporators comfortably.