चारकोपमधील २७ सिलिंडरची चोरी करणारा निघाला ६० हून अधिक गुन्ह्यांमधील आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:11 IST2026-04-09T12:10:05+5:302026-04-09T12:11:26+5:30

२७ सिलिंडर चोरीला गेल्याने खळबळ उडाली. आरोपीवर जबरी चोरी व घरफोडीचे ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

The man who stole 27 cylinders from Charkop turned out to be an accused in more than 60 crimes. | चारकोपमधील २७ सिलिंडरची चोरी करणारा निघाला ६० हून अधिक गुन्ह्यांमधील आरोपी

चारकोपमधील २७ सिलिंडरची चोरी करणारा निघाला ६० हून अधिक गुन्ह्यांमधील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चारकोप परिसरात टेम्पोमधून २७ घरगुती सिलिंडर चाेरीला गेले होते. या प्रकरणाचा तांत्रिक तपास राबवत गुन्हे शाखेने आरोपीच्या पालघरमधून मुसक्या आवळल्या.  मनोज शर्मा (३२) असे सराइताचे नाव असून त्याच्यावर जबरी चोरी व घरफोडीचे ६०हून अधिक गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी  त्याच्याकडून ६ लाख ६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी  नालासोपारा पुर्वेतील आदिशक्ती सोसायटीचा रहिवासी आहे. नंदकुमार सोनी (३५) या श्रीजी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याने  काका केणी चौकात पार्क केलेल्या टेम्पो फोडून २७ सिलिंडर चोरी झाल्याची तक्रार दिली होती. 

अशी राबवली तपास मोहीम

परिमंडळ-११चे उपायुक्त संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक राजू थोरात, उपनिरीक्षक आबासाहेब पवार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार बाजीराव कराटे, स्वप्निल शिंदे, घनश्याम पाटेकर, शिपाई विलास मस्के, सुदेश गायकवाड आणि आदित्य राणे यांनी तपास मोहीम राबवली.

पालघर परिसरात एक संशयित टेम्पो फिरताना दिसताच टेम्पो अडवून शर्मा याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ सिलिंडर मिळून ६ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

Web Title : चारकोप सिलेंडर चोर: 60+ अपराधों वाला आदतन अपराधी गिरफ्तार

Web Summary : चारकोप से 27 गैस सिलेंडर चुराने के आरोप में मनोज शर्मा नामक एक अनुभवी अपराधी को गिरफ्तार किया गया, जिस पर पहले से ही 60 से अधिक अपराध दर्ज हैं। पुलिस ने पालघर में उससे 6.06 लाख रुपये का चोरी का सामान बरामद किया। संदिग्ध टेम्पो के साथ पकड़े जाने पर उसने अपराध कबूल कर लिया।

Web Title : Charkop Cylinder Thief: Serial Offender with 60+ Crimes Arrested

Web Summary : A seasoned criminal, Manoj Sharma, with over 60 prior offenses, was arrested for stealing 27 gas cylinders from Charkop. Police recovered stolen goods worth ₹6.06 lakhs from him in Palghar. He confessed to the crime after being apprehended with a suspicious tempo.