शिंदे, फडणवीस, पवारांची नीती आयोगासोबत बैठक; आता एक स्वतंत्र टीम नेमण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:29 PM2023-08-29T12:29:57+5:302023-08-29T12:37:25+5:30

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या बैठकीची माहिती दिली. 

The GDP of the metropolitan region will increase to 300 million dollars; Shinde, Fadnavis, Pawar meeting with NITI Aayog | शिंदे, फडणवीस, पवारांची नीती आयोगासोबत बैठक; आता एक स्वतंत्र टीम नेमण्यात येणार

शिंदे, फडणवीस, पवारांची नीती आयोगासोबत बैठक; आता एक स्वतंत्र टीम नेमण्यात येणार

googlenewsNext

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नीती आयोगचे सीईओ बीव्हीआर सुब्रमणियम यांच्यासमवेत मंत्रालयात आज बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या बैठकीची माहिती दिली. 

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर क्षमता असून महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी नीती आयोग समवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीती आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: The GDP of the metropolitan region will increase to 300 million dollars; Shinde, Fadnavis, Pawar meeting with NITI Aayog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.