मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 08:55 IST2023-12-26T08:54:32+5:302023-12-26T08:55:51+5:30

मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. 

thackeray group claim for maval lok sabha upheld in the meeting on matoshree | मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब

मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा दावा कायम; मातोश्रीवरील बैठकीत शिक्कामोर्तब

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): शिरूर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असल्याने आता ठाकरे गटाकडून मावळ मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात गेले असले तरी ठाकरे गटाने दावा कायम ठेवला आहे. मावळ मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित करण्यावर शिक्कामोर्तब झाले. 

मावळ मतदार संघावर ठाकरे यांनी दावा करत तगडा उमेदवार देण्याची चाचपणी सुरू केली आहे. आमदार सचिन अहिर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले,  मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार देईल. उमेदवार कोण असेल याचा निर्णय लवकरच होईल. पण ही जागा जिंकून आणण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली. तसेच देशातील इंडिया आणि राज्यातील महाविकास आघाडीत ‘वंचित बहुजन आघाडी’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या प्रवेश याबाबतचा निर्णय पक्षातील आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील, असे ते म्हणाले.


 

Web Title: thackeray group claim for maval lok sabha upheld in the meeting on matoshree