Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकलं होतं परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 20:56 IST

शिवरायांचा महाराष्ट्र हाजी हाजी करणार नाही. शिवसैनिक हे माझी तलवार आहे.

मुंबई - अजित पवार तुमच्या डोळ्यात पाणी आहे पण धरणात पाणी नसणार तर काय करणार? तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आलेले आहे. जे शस्त्र तुम्ही शिवसेनेवर उगारलं तेच अस्त्र तेच शस्त्र यांनी तुम्हाला संपवलेल आहे अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल. तुम्ही ठेवलेला विश्वासा बद्दल मी खूप मनापासून शिवसैनिकांचे आभार मानतो. धनुष्यबाण ही निशाणी घेतली तेव्हा राम मंदिर हा विषयही नव्हता. रामांचे शिवधनुष्य हे शस्त्र घेऊन आम्ही मैदानात उतरत असतो. धनगराच्या काठीला तलवारीची धार असली पाहिजे. अन्यायाच्या विरोधात लढणारी तलवार असली पाहिजे. कोणाला वाटलं असेल की, शिवसेना झुकली चंद्रकांत पाटील म्हणाले होते आम्हाला समजून घ्या, घेतले समजून पण धनगरांना मराठ्यांना आरक्षण आम्ही द्यायला लावणार. या देशाचे मुसलमान जरी आपल्यासोबत आले तरी आम्ही त्यांच्या न्याय हक्क यांना न्याय देवू असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिवरायांचा महाराष्ट्र हाजी हाजी करणार नाही. शिवसैनिक हे माझी तलवार आहे. अन्यायापासून रक्षण करणारी ही ढाल आहे. समोरून आलिंगन देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या पोटातून कोथळा काढणारी वाघनखे आहेत. आपली ताकद काँग्रेसच्यापाठी कदापी उभी करणार नाही. सुडाचे राजकारण जर कोणी करायला गेले तर त्याला तोडून मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी आता थकू नका ताजेतवाने राहा असं सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

दरम्यान, शिवसेना वैर करेल तर उघड उघड करेल. शिवसेना कधीही कोणासमोर झुकणार नाही. एकतर मरेन किंवा मारायची शिवसैनिकाची जात आहे. देशद्रोहाचा खटला काढून टाकणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का ? जोपर्यंत आम्ही त्यांचे टार्गेट आहोत तोपर्यंत आमचे देखील टार्गेट तेच राहणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसअजित पवार