पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:06 IST2025-07-02T09:05:46+5:302025-07-02T09:06:52+5:30

Crime News: देशातील आघाडीच्या शाळांपैकी एक असलेल्या एका शाळेतील महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

Teacher from prestigious school arrested for sexually abusing student by taking him to five-star hotel | पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  

AI Generated images

मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या शाळेतील एका महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षिकेविरोधात पॉक्सो कायदा, जुवेलवनाइल जस्टिस अॅक्ट आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थ्याचं मागच्या वर्षभरापासून लैंगिक शोषण होत होतं. यादरम्यान आरोपी शिक्षिकेने या विद्यार्थ्याला मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं. आरोपी शिक्षिका या विद्यार्थ्याला अँटी डिप्रेसेंट औषधंही द्यायची, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्याने एचएससी परीक्षा दिल्यानंतर आई-वडिलांना त्याच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसेच या तक्रारीनुसार आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.  

Web Title: Teacher from prestigious school arrested for sexually abusing student by taking him to five-star hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.