मालवणीत १५ वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:06 IST2021-02-25T04:06:57+5:302021-02-25T04:06:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालवणीत एका १५ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती ...

Suspicious death of 15 year old girl in Malvani | मालवणीत १५ वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

मालवणीत १५ वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालवणीत एका १५ वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

मालवणीच्या गायकवाडनगर डेपो परिसरात मयत मुलगी एस. सय्यद भाऊ आणि आईसोबत राहत होती. तिचे भाऊ शाहरुख शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी ते एका लग्न समारंभासाठी मित्रासोबत लखनऊला निघाले होते. त्या दरम्यान त्यांचे अन्सारीशी बोलणे झाले होते. मात्र, २२ फेब्रुवारी, २०२१ ते जेव्हा लखनऊला पोहोचले, तेव्हा त्यांना बहिणीने आत्महत्या केल्याचे समजले. त्यानुसार, ते विमानाने तातडीने घरी पोहोचले. फोनवर बोलताना बहीण कोणत्याही तणावात वाटत नव्हती. त्यामुळे तिने अचानक असे पाऊल का उचलले, याबाबत शेख यांनी आश्चर्य व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. अन्सारी हिने औषधाच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तिने मृत्यूपूर्वी तिच्या अन्य भावंडांनाही मेसेज करत विचारपूस केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्र पोलिसांना सापडले असून, तिच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा पोलीस करीत आहेत.

Web Title: Suspicious death of 15 year old girl in Malvani