Sushant Singh Rajput Death Case: 'त्या' प्रकरणांतील किती खरे आरोपी सीबीआय पकडू शकली?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 09:12 AM2020-08-20T09:12:05+5:302020-08-20T09:13:29+5:30

शिवसेनेकडून सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

Sushant Singh Rajput Death Case shiv sena questions cbi investigation in various cases | Sushant Singh Rajput Death Case: 'त्या' प्रकरणांतील किती खरे आरोपी सीबीआय पकडू शकली?; शिवसेनेचा सवाल

Sushant Singh Rajput Death Case: 'त्या' प्रकरणांतील किती खरे आरोपी सीबीआय पकडू शकली?; शिवसेनेचा सवाल

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं काल या प्रकरणी निकाल दिला. त्यामुळे राज्य सरकारला धक्का बसल्याचं मानलं जात आहे. याबद्दल शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. बिहारमध्ये अनेक हत्या, खून झाले. त्या प्रकरणांमधील किती खरे आरोपी सीबीआयनं पकडले?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेनं सामनामधून सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

बिहारमधील अनेक खून, हत्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, पण त्यापैकी किती खरे आरोपी आतापर्यंत सीबीआय पकडू शकली? ब्रह्मेश्वर मुखियाने रणवीर सेना नावाची खासगी 'फौज' बनवली होती. त्याची हत्या होताच बिहारात दंगल उसळली. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. मुखियाचे खरे आरोपी कोणी पकडले असतील तर सांगावे. मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड असेल नाहीतर सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय व सत्य यांनी विजय मिळविला नाही, याकडे शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.

शिवसेनेची जोरदार टीका; महत्त्वाचे मुद्दे-

- न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये. 

- कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले हे बरोबर नाही.

- सीबीआयकडे तपास सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने हळूच फुंकर मारली, ''मुंबई पोलिसांच्या तपासात सकृत्दर्शनी काहीच चूक दिसत नाही.'' तरीही प्रामाणिकपणाची कदर न करता तपासाची सूत्रे सीबीआयकडे द्यावीत हे आश्चर्यच आहे. 

- देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला यापद्धतीने घुसवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या संघराज्यावरचे आक्रमण आणि त्यांनी आखून दिलेली चौकट मोडण्याचाच प्रकार आहे. 

- सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याची घोषणा होताच बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे अत्यानंदी चेहऱयाने बाहेर आले व राजकीय निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावात पत्रकारांसमोर म्हणाले, ''ये न्याय की अन्याय पर जीत है.'' पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते.

- पाटण्यात जो एफआयआर नोंदवला तो बरोबर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालय व्यक्त करते. कारण सुशांतचे वडील पाटण्यात राहतात. उद्या या प्रकरणातील इतर 'पात्रे' वेगळ्या राज्यांतील आहेत म्हणून आमच्या राज्यातील लोकांवर अन्याय होतोय असे ठरवून बंगालसारख्या राज्यात एफआयआर दाखल झाले तर कोलकात्याच्या पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार मिळणार आहे काय?

राज्य सरकार सहकार्य करेल, पण...; शरद पवारांचा सीबीआयवर निशाणा

पार्थनं काय ट्विट केलंय, कसं आणि का लिहिलंय? याची माहिती नाही; रोहित पवारांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया; ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला...

सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की...

"सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया

Web Title: Sushant Singh Rajput Death Case shiv sena questions cbi investigation in various cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.