सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, अजितदादांच्या आठवणीने झाल्या भावूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:49 IST2026-02-10T13:48:50+5:302026-02-10T13:49:41+5:30
Sunetra Ajit Pawar News: उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा अजित पवार यांनी मुंबईत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला, अजितदादांच्या आठवणीने झाल्या भावूक!
Sunetra Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर आता सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी सुनेत्रा पवार या अजितदादांच्या आठवणीने भावूक झाल्याचे म्हटले जात आहे.
सुनेत्रा अजित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून भावनांना वाट मोकळी करून दिली. आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण...
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असा शब्द सुनेत्रा अजित पवार यांनी दिला.
आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026
दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि… pic.twitter.com/5Tc2PsfDQ9
दरम्यान, प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेत गणरायाचरणी नतमस्तक झाले. सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले, पूजा केली. लोककल्याणाचे, विकासाचे कार्य निरंतर पुढे हाकण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना केली, अशी माहिती सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेत गणरायाचरणी नतमस्तक झाले. सिध्दिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले, पूजा केली. लोककल्याणाचे, विकासाचे कार्य निरंतर पुढे हाकण्यासाठी बळ दे, अशी प्रार्थना केली. pic.twitter.com/krPrfZfvlT
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 10, 2026