मुंबई - राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार काही आयपीएस अधिकाऱ्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा सनसनाटी गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला होता, दरम्यान, अनिल देशमुख यांच्या या विधानावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री अशी विधाने, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांनी असं बोलणं अपेक्षित नाही. राज्यात अशी कृत्ये करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत नाही. पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत. गृहमंत्री राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशी विधाने करत आहेत.
कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री करताहेत अशी विधाने, प्रवीण दरेकरांचा टोला
By बाळकृष्ण परब | Updated: September 20, 2020 12:18 IST
काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमत ऑनलाइनच्या ''ग्राउंड झीरो''कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत केला होता.
कोरोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी गृहमंत्री करताहेत अशी विधाने, प्रवीण दरेकरांचा टोला
ठळक मुद्देराज्याच्या गृहमंत्र्यांनी असं बोलणं अपेक्षित नाहीराज्यात अशी कृत्ये करण्याची अधिकाऱ्यांची हिंमत नाहीपोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मर्यादा माहिती आहेत