'मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा'; रोहित पवार मुंबईकरांसाठी धावले
By मोरेश्वर येरम | Updated: January 12, 2021 14:29 IST2021-01-12T14:27:03+5:302021-01-12T14:29:16+5:30
रोहित पवार यांनी आज मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली.

'मुंबईची लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करा'; रोहित पवार मुंबईकरांसाठी धावले
मुंबई
राज्यात अनलॉकच्या टप्प्यात सर्व गोष्टी हळूहळू सुरू केल्या जात असताना मुंबईची लोकल मात्र अद्याप सर्वांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई लोकल आता सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी आज मुंबईत परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेतली. रोहित पवार यांनी यावेळी अनिल परब यांच्याकडे लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठीचं पत्र परिवहन मंत्र्यांना दिलं. रोहित पवार यांनी अनिल परब यांच्या भेटीचं एक ट्विट देखील केलं आहे.
"लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत एपीएमसीमध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठी लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली", असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत #APMC मध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती परिवहनमंत्री @advanilparab
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2021
साहेबांना केली. pic.twitter.com/R4OHpWWCLl
मुंबई लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्रीही सकारात्मक
मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल सेवा सर्वांसाठी खुली करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सकारात्मक विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही म्हटलं जात आहे. मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच लोकलमधून प्रवासाची परवानगी आहे.