शैक्षणिक सहलींमुळे एसटीचे उत्पन्न वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 05:07 AM2020-03-04T05:07:27+5:302020-03-04T05:07:32+5:30

२०१९-२० या वर्षात शैक्षणिक सहलींमुळे एसटीला तब्बल ६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. २०१८-१९ च्या तुलनेने यामध्ये तब्बल ३६ कोटींनी वाढ झाली आहे.

ST trips increased due to educational trips | शैक्षणिक सहलींमुळे एसटीचे उत्पन्न वाढले

शैक्षणिक सहलींमुळे एसटीचे उत्पन्न वाढले

googlenewsNext

सीमा महांगडे 
मुंबई : शैक्षणिक सहल म्हटली की, राज्याच्या विशेषत: ग्रामीण भागात सर्वप्रथम एसटी महामंडळाची लालपरी नजरेसमोर येते. मात्र, मागील ३ वर्षांत शिक्षण विभागाने सहलीसाठी एसटीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर, एसटी महामंडळाने विविध योजनांद्वारे यासाठी पुढाकार घेतल्याने चित्र पालटले आणि २०१९-२० या वर्षात शैक्षणिक सहलींमुळे एसटीला तब्बल ६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. २०१८-१९ च्या तुलनेने यामध्ये तब्बल ३६ कोटींनी वाढ झाली आहे.
शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, मुरूड येथील समुद्र किनाऱ्यावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने २०१८-१९ मध्ये शैक्षणिक सहलींसंदर्भात परिपत्रक जारी केले. सहल कोणत्याही पर्यटन अथवा मनोरंजन स्थळावर घेऊन जाण्यास या परिपत्रकाद्वारे बंदी घातली होती, मुलांचा विमा काढणे, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे, पालकांचे हमीपत्र, प्राचार्यांचे संमतीपत्र सादर करणे, अशा अनेक किचकट अटींमुळे शाळांकडून सहलींचे आयोजन करणे टाळले जाऊ लागले. याचा विपरित परिणाम या सहली सुरक्षितपणे घेऊन जाणाºया एसटी आणि त्यांना मिळणाºया महसुलावर झाला. साहजिकच, २०१७-१८ मध्ये एसटीला शालेय सहलींमधून ६३ कोटी उत्पन्न प्रतिपूर्ती रकमेसह मिळाले होते, त्यात घट होऊन २०१८-१९ मध्ये ते थेट २४ कोटींवर आले.
त्यानंतर, राज्य परिवहन महामंडळाचा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाने कंबर कसली. विभागस्तरावर अधिकारी नियुक्त करुन आगारप्रमुख आणि अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांची भेट घेऊन समुपदेशन केले. एसटी सरकारी असून विम्याची सोय आहेच, शिवाय विद्यार्थी, शाळांना नुकसान होणार नाही असे आश्वासित केले होते.
>शैक्षणिक सहली या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. शिक्षण विभागाकडून साहाय्य मिळाल्यास शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अध्ययन आणि एसटीकडून होणारा सुरक्षित प्रवास या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतील.
- राहुल तोरो, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामडळ
>वर्ष सहली महसूल
२०१७-१८ १,४५४ ६३
२०१८-१९ ५,२४८ २४
२०१९-२० १०,७८९ ६०
(प्रतिपूर्ती रकमेसह - कोटींमध्ये)

Web Title: ST trips increased due to educational trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.