ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:58 PM2022-01-10T19:58:47+5:302022-01-10T19:59:31+5:30

ST Strike : गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे

ST Strike : Expulsion of Sadavarten, appointment of new advocates for ST workers' case | ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

Next

मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात हवा भरणाऱ्या आणि विलिगीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार, असं सांगणाऱ्या विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंकडून आता हा खटला काढून घेण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्तेंऐवजी एड. सतिश पेंडसे यांनी या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत सरकारवर टीका करणाऱ्या सदावर्तेंना कर्मचाऱ्यांनी नाकारल्याचं दिसून येत आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. यानंतर बोलताना कृती समितीच्या काही सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंनी विलनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला आहे. कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकील म्हणत आहेत. पण गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत. दोन महिने सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे, असे सुनील निरभवणे यांनी म्हटले आहे. तर, सदावर्ते यांना पत्र दिलंय.. आता आम्ही नवीन वकिल सतिश पेंडसे यांना वकील म्हणून नेमलं आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य असेल. सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हावे, असं आवाहनही एसटी संघटनेच्या अजय कुमार गूजर यांनी केलं. 

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. त्यानंतर बोलताना कृती समितीच्या काही सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर, शरद पवार यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन करत लाल परी धावण्याची जबाबदारी आपली असल्याचं म्हटलंय. 
 

Web Title: ST Strike : Expulsion of Sadavarten, appointment of new advocates for ST workers' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.