ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’ फरकावर सरकारचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 10:32 AM2022-11-14T10:32:55+5:302022-11-14T10:33:59+5:30

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांचा २८ टक्क्यांवरून महागाई भत्ता (डीए) ३४ टक्के करावा, अशी फाईल सरकार दरबारी गेले चार महिने पडून असून संचालक मंडळाच्या बैठकीअभावी त्यावर निर्णय झालेला नाही.

ST Employee: Govt's crackdown on 'DA' difference for ST employees | ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’ फरकावर सरकारचा डल्ला

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’ फरकावर सरकारचा डल्ला

Next

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा २८ टक्क्यांवरून महागाई भत्ता (डीए) ३४ टक्के करावा, अशी फाईल सरकार दरबारी गेले चार महिने पडून असून संचालक मंडळाच्या बैठकीअभावी त्यावर निर्णय झालेला नाही. कर्मचाऱ्यांच्या करोडो रुपयांच्या फरकाच्या रकमेवर सरकार डल्ला मारीत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटीकर्मचारी काँग्रेसने केला आहे.
एसटी कर्मचारी काँग्रेसचे  सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. एसटी कर्मचाऱ्यांना अजून २८ टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वेतनासाठीच्या सरकार मदत करत आहे. महागाई भत्ता हा वेतनाशी संबधित आहे ३४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यासाठी फक्त १५ ते १८ कोटी इतकी रक्कम लागते. पण तो वेतनाचा भाग असल्याने सरकारच्या व संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय तो वितरित करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

Web Title: ST Employee: Govt's crackdown on 'DA' difference for ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.