...म्हणून शिवसेनेचे 4 मोठे नेते पराभूत झाले; राज ठाकरेंनी केला दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 01:20 PM2019-08-09T13:20:15+5:302019-08-09T13:57:11+5:30

एखाद्या मतदारसंघात १ लाख मतदान झालं असेल तर तिथे १ लाख २० हजार मतदान मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं

.... So 4 major leaders of the Shiv Sena were defeated; Raj Thackeray's claim | ...म्हणून शिवसेनेचे 4 मोठे नेते पराभूत झाले; राज ठाकरेंनी केला दावा 

...म्हणून शिवसेनेचे 4 मोठे नेते पराभूत झाले; राज ठाकरेंनी केला दावा 

Next

मुंबई - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असंही राज यांनी सांगितले. 

यावेळी बोलताना राज यांनी ईव्हीएमवरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं. २३ मेला लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ पैकी २५ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, तर पुढे चारच दिवसात त्याच राज्यात कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली कशी? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या असं त्यांनी सांगितले. एखाद्या मतदारसंघात १ लाख मतदान झालं असेल तर तिथे १ लाख २० हजार मतदान मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसं शकतं, बरं निवडणूक आयोगात जाऊन देखील न्याय मिळत नाही ना न्यायालयांमध्ये असा आरोपही त्यांनी केला. 

तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ३५० जागा येतील अशा घोषणा भाजपचे नेते करत होते, तसंच झालं. आत्ता पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २२०,२३० असे आकडे घोषित करत आहेत, आणि हा आकडा खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचा आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या. एक दोन अपवादात्मक माध्यमं सोडली तर कोणीच सत्य मांडू शकत नाही आणि ह्या माध्यमांवर पण वरून दडपण आणलं जात आहे. आणि हे सगळं बहुमताच्या जोरावर केलं जातंय असं राज ठाकरेंनी सांगितले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी देखील मतपत्रिकांवरच मतदान व्हायला हवं अशी घोषणा केली, बरं ह्याच अमेरिकेत ह्या ईव्हीएमची चिप बनते पण ह्या देशांचा ईव्हीएमवर विश्वास नाही मग आपण का हट्ट धरतोय? निवडणूका मतपत्रिकांवर घ्याव्यात ही आमची मागणी आहे आणि ती गैर नाही ३७१ मतदारसंघांमध्ये भाजपने ईव्हीएमच्या जोरावर फेरफार केले गेले पण ह्यावर कोणी बोलायला तयार नाही अशी खंत राज यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: .... So 4 major leaders of the Shiv Sena were defeated; Raj Thackeray's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.