उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील भैंसा गावात बुधवारी स्मशानशांतता पसरली होती. ज्या गावच्या मुलीचा साऱ्या गावाला अभिमान होता, तीच मुलगी एका भीषण विमान अपघातात कायमची जग सोडून गेली. खासगी चार्टर्ड विमानामध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या पिंकी माळीच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच प्रत्येकाचे डोळे पाणावले. हा अपघात महाराष्ट्रातील बारामती येथे झाला असून यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
पिंकी माळी ही मूळची जौनपूरच्या भैंसा गावाची रहिवासी होती. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहून एव्हिएशन क्षेत्रात काम करत होती. बुधवारी सकाळी जेव्हा अजित पवारांचं विमान कोसळल्याची आणि त्यात पिंकीचाही मृत्यू झाल्याची बातमी आली, तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
"गेल्या आठ वर्षांपासून ती एअर होस्टेस"
पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. मुलीला गमावल्याच्या दुःखाने ते पूर्णपणे खचले आहेत. थरथरत्या आवाजात ते म्हणाले, "आम्ही झोपडपट्टीवाले आहोत, पण माझ्या मुलीने जे करून दाखवलं त्याचा मला सार्थ अभिमान होता. गेल्या आठ वर्षांपासून ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. सुरुवातीची तीन वर्षे ती अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती, त्यानंतर तिचं प्रमोशन झालं आणि ती कलीना-सांताक्रूझ येथे खासगी चार्टर्ड विमानांमध्ये काम करू लागली."
"अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण..."; पिंकीच्या आईचा टाहो
"मेहनतीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख"
वडिलांनी सांगितलं की, पिंकीने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या पाच वर्षांपासून ती चार्टर्ड विमानांमध्ये तैनात होती आणि देशातील अनेक बड्या नेत्यांसह व्हीआयपींसोबत तिने प्रवास केला होता. ती चार वेळा अजित पवार यांच्यासोबत फ्लाइटमध्ये गेली होती. याशिवाय देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रपतींसोबतही तिने खासगी चार्टर्ड फ्लाइटमध्ये काम केलं होतं.
लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरंच; पायलट शांभवी पाठकच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
"पिंकीचं नाव समोर आलं, तसं सर्वकाही संपलं"
अपघाताच्या अवघ्या एक दिवस आधी पिंकीने वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. तिचे शेवटचे शब्द होते- "पप्पा, मी अजित दादा पवारांसोबत बारामतीला जाईन, त्यांना तिथे सोडून मग नांदेडला जाईन. त्यानंतर हॉटेलवर गेल्यावर निवांतपणे तुम्हाला फोन करेन." सकाळी जेव्हा अजित दादांचं विमान क्रॅश झाल्याची बातमी आली, तेव्हा हात-पाय थरथरू लागले आणि जसं पिंकीचं नाव समोर आलं, तसं सर्वकाही संपलं असं वडिलांनी म्हटलं आहे.
"करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते"; एकनाथ शिंदेंची भावुक पोस्ट
कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, पिंकी नुकतीच मालदीवच्या ड्युटीवरून परतली होती. कामात तिचा रेकॉर्ड उत्कृष्ट होता आणि तिला प्रमोशनही मिळालं होतं. पिंकीचे शिक्षण महाराष्ट्रातील ठाणे येथे झाले होते. जौनपूरमधील गावकऱ्यांनी सांगितलं की, तिचे वडील अनेक वर्षांपूर्वी मुंबईला स्थायिक झाले असले, तरी गावाशी त्यांचं नातं कधीच तुटलं नाही. गावाचे सरपंच राजू पाल यांनी सांगितले की, पिंकी दरवर्षी दुर्गा पूजेच्या वेळी गावी येत असे आणि पूजेच्या नियोजनात उत्साहाने सहभागी होत असे. पिंकीचं लग्न वर्षभरापूर्वीच गोरखपूरमध्ये झालं होत. लग्नानंतरचं नवं आयुष्य, करिअरमधील उत्तुंग भरारी आणि कुटुंबाची मोठी स्वप्नं... या साऱ्याचा एका क्षणात अंत झाला.
Web Summary : Pinky Mali, an air hostess from a humble background, tragically died in the Baramati plane crash involving Ajit Pawar's aircraft. Her father, a proud slum dweller, mourns her achievements and service to VIPs, including political leaders. She was recently married.
Web Summary : पिंकी माली, एक विनम्र पृष्ठभूमि से आने वाली एयर होस्टेस, अजित पवार के विमान से जुड़ी बारामती विमान दुर्घटना में दुखद रूप से मर गईं। उनके पिता, एक गौरवान्वित झुग्गीवासी, राजनेताओं सहित वीआईपी को उनकी उपलब्धियों और सेवा पर शोक व्यक्त करते हैं। हाल ही में उनकी शादी हुई थी।