VIDEO: जिओ चल नही रहा; भर कार्यक्रमात फोटोग्राफरनं मुकेश अंबानींकडे तक्रार केली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 19:13 IST2018-12-03T19:03:45+5:302018-12-03T19:13:07+5:30

जिओबद्दलची तक्रार ऐकून अंबानींच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले

sir Jio nahi chal raha Photographer quips when clicking Mukesh Ambanis photo Video goes viral | VIDEO: जिओ चल नही रहा; भर कार्यक्रमात फोटोग्राफरनं मुकेश अंबानींकडे तक्रार केली अन्...

VIDEO: जिओ चल नही रहा; भर कार्यक्रमात फोटोग्राफरनं मुकेश अंबानींकडे तक्रार केली अन्...

मुंबई: दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाच्या मुंबईतील रिसेप्शनला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. बॉलीवूडमधील अनेक प्रख्यात कलाकार आणि देशातील नामवंत उद्योगपती या सोहळ्याला हजर होते. या सोहळ्यावेळी एक गमतीशीर किस्सा घडला. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचा फोटो काढताना एका फोटोग्राफरनं जिओच्या नेटवर्कची तक्रार केली. अचानक भर कार्यक्रमात आलेली ही तक्रार ऐकून नेमकं काय बोलायचं, हे अंबानींना कळलंच नाही. मात्र तेवढ्यात भांबावलेल्या अंबानींच्या मदतीला अभिनेता संजय दत्त धावून आला. 

दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंह यांच्या मुंबईतील रिसेप्शनला अंबानी कुटुंब उपस्थित होतं. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांचे फोटो काढत होते. यावेळी मुकेश अंबानी यांच्यासोबत पत्नी निता अंबानी, मुलगी इशा, मुलगा आकाश आणि अनंत, आकाशची होणारी पत्नी श्लोका मेहता आणि अनंतची मैत्रीण राधिका मर्चंट उपस्थित होती. संपूर्ण अंबानी कुटुंब फोटोसाठी पोझ देत असताना एका फोटोग्राफरनं मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स जिओच्या नेटवर्कची तक्रार केली. 'सर, जिओ नहीं चल रहा,' असं हा फोटोग्राफर ओरडला. भर कार्यक्रमात हा प्रकार घडल्यानं आता नेमकं करायचं तरी काय, असा प्रश्न मुकेश अंबानींना पडला. त्यांच्या चेहऱ्यावरुन तसं अगदी स्पष्ट दिसत होतं. 



रिलायन्स जिओनं अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत भारतीय बाजारातील भल्याभल्या कंपन्यांना घाम फोडला. जिओशी स्पर्धा करण्यासाठी व्होडाफोन, एअरटेल, आयडियाला इंटरनेट सेवेचे दर कमी करावे लागले. मात्र जिओची तक्रार भर कार्यक्रमात फोटोग्राफरनं केल्यानं अंबानींना नेमकं काय बोलावं तेच कळलं नाही. मात्र तितक्यात तिकडे अभिनेता संजय दत्त आला. त्याला पाहताच अंबानी त्याच्याकडे गेले आणि त्यांना फोटोग्राफरच्या तक्रारीपासून कशीबशी आपली सुटका करुन घेतली. 

Web Title: sir Jio nahi chal raha Photographer quips when clicking Mukesh Ambanis photo Video goes viral