आपले ‘ते’ चॅट विद्यार्थ्यांना दाखवू का? महिलेने शिक्षकाकडून उकळले १५ हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 14:20 IST2023-10-09T14:19:47+5:302023-10-09T14:20:43+5:30
फिर्यादी सोहम (नावात बदल) हे अंधेरी पश्चिम येथे खासगी शिकवणी घेतात. त्यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एक महिला नोकरी मागण्याच्या निमित्ताने आली आणि लुटीचा डाव आखला.

आपले ‘ते’ चॅट विद्यार्थ्यांना दाखवू का? महिलेने शिक्षकाकडून उकळले १५ हजार
मुंबई : अंधेरीमध्ये खासगी शिकवणी चालवणाऱ्या ५० वर्षीय मालकाला दोघांचे झालेले चॅटिंग दाखवत बदनामीची तसेच त्याचा क्लास जाळण्याची धमकी एका महिलेने दिली. याप्रकरणी मालकाने दिलेल्या तक्रारीनंतर महिलेविरोधात डी एन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास सुरू असून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी सोहम (नावात बदल) हे अंधेरी पश्चिम येथे खासगी शिकवणी घेतात. त्यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात एक महिला नोकरी मागण्याच्या निमित्ताने आली आणि लुटीचा डाव आखला.
लोकांना लुबाडणाऱ्या टोळीशी संबंधित? -
- महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सोहम यांनी डी एन नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
- या महिलेची दुसऱ्यांदा तक्रार पोलिसांना मिळाली असून, यापूर्वीही तिने असाच प्रकार केला होता. तेव्हा तिला पोलिस ठाण्यात आणत समज देऊन सोडण्यात आले. मात्र पुन्हा तक्रार आल्याने हाय प्रोफाईल लोकांना टार्गेट करत लुबाडणाऱ्या टोळीशी ती संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे सध्या तिचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.