'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:40 AM2022-05-20T10:40:21+5:302022-05-20T10:41:25+5:30

कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेतला लगावला आहे.

shivsena leader Sanjay Raut slams mns chief mns chief Raj Thackeray over ayodhya visit postponed | '...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

'...तर राज ठाकरेंना आम्ही मदत केली असती', संजय राऊतांचं मोठं विधान!

googlenewsNext

मुंबई-

कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्यावं, असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेतला लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ट्विट करत ५ जून रोजी होणारा त्यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता राज ठाकरेंनी जर अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती, असा टोला लगावला. संजय राऊत यांनी यावेळी आदित्य ठाकरेंचा दौरा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचंही म्हटलं. 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, कारण काय? पुण्यातील सभेत सविस्तर बोलणार

"आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा नियोजित वेळेतच होणार आहे. आदित्य ठाकरे ठरलेल्या दिवशीच म्हणजे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जातील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील. पण राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत भाजपानं त्यांच्यासोबत असं का केलं? या लोकांकडून लहान पक्षांचा असाच वापर केला जातो हे आता तरी यांनी लक्षात घ्यावं", असं संजय राऊत म्हणाले.  

"शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. आम्ही अयोध्या, वाराणसी, काशी इथं जातच असतो. त्यामुळे कुणाला या ठिकाणी दौऱ्याला वगैरे जावं वाटत असेल तर आम्ही मदत करत असतो. इतर कुणी जात नसले तरी आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जात आहेत आणि त्यांच्यासोबत ज्यांना ज्यांना यावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की यावं", असंही राऊत म्हणाले

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे.

पुण्यात २२ मे रोजी सभा होणार
पुण्यात २१ मे रोजी नदीपात्रात होणारी मनसेची जाहीर सभा देखील पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली होती. पण आता ही सभा २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. याच सभेत आता राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित का केला याची माहिती देणार आहेत.

Web Title: shivsena leader Sanjay Raut slams mns chief mns chief Raj Thackeray over ayodhya visit postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.