शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 09:39 AM2024-03-15T09:39:10+5:302024-03-15T09:43:46+5:30

लोकसभा निवडणूक जवळ येईल तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे.

Shiv Sena's 12 MLAs will return to Uddhav Thackeray? Lawyer Asim Sarode's claim | शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली

शिवसेनेचे १२ आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? असीम सरोंदेंनी यादीच वाचून दाखवली

लोकसभा निवडणूक जवळ येईल तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे, दरम्यान, आता शिवसेनेतील १२ आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, याबाबत काल वकील असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.  

महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. दोन दिवसात जागावाटप होईल असं बोललं जात आहे. भाजपने शिंदे गटाच्या आधीपेक्षा जागा कमी केल्या असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सुर असल्याचे बोलले जात आहे, यामुळे आता काही नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. 

भाजपाचे बीएस येडीयुराप्पा अडचणीत; 17 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप, पोक्सो दाखल

दुसरीकडे, काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील १२ आमदारांची यादी वाचून दाखवली. हे आमदार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचे बोलले जात आहे. 

हे बारा आमदार ठाकरेंकडे परतणार

काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी बारा आमदारांची यादी वाचून दाखवली. हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. यात आमदार श्रीनिवास वनगा, आमदार लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर  या आमदारांच्या नावांचा समावेश आहे. 

वकील असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यातील दोन आमदार आधीपासून ठाकरे गटात आहेत, उदयसिंह राजपूत आणि नितीनकुमार देशमुख (तळे) ठाकरे गटात आहेत.  

" हे बारा आमदार परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात येण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आले आहे की आपलं यांच्यासोबत भविष्य नाही. ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही, असा टोलाही सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. राष्ट्रवादीचेही अनेक नेते परत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आता उद्वव ठाकरे आणि शरद पवार यांनी यांना परत घेतलं नाही पाहिजे, असंही वकील असीम सरोदे म्हणाले.  

Web Title: Shiv Sena's 12 MLAs will return to Uddhav Thackeray? Lawyer Asim Sarode's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.