Join us

'आता तुम्हाला कंठ फुटला असेल तर...'; शिवसेनेचा अमृता फडणवीसांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 16:29 IST

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे.

मुंबई:  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या विधानावरुन सध्या युद्ध रंगले आहे. अमृता फडणवीस यांनी फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी ठाकरे होऊ शकत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. अमृता फडणवीस यांच्या या विधानावरुन शिवसेनेकडून देखील जसेच तसे प्रत्युत्तर देण्यात आले होते. तसेच पिंपरीमध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारत राघोबादादा तुमच्या आनंदीबाईंना आवारा अशी घोषणा करण्यात आल्या होता.

शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर अमृता फडणवीस यांनी पिंपरीमधील आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शायरीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली होती.  You don’t lead people by hitting people over the head, that’s assault - not leadership CM Uddhav Thackeray असं म्हणत दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे या शायरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. अमृता फडणवीस यांच्या या टीकेला युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी इशारा दिला आहे.

वरुण सरदेसाई म्हणाले की, गेल्या ५ वर्षात आपण महाराष्ट्राला आपल्यावर टीका करायच्या अनेक संध्या दिल्या पण शिवसेनेने कधी ही वैयक्तिक टीका केली नाही कारण आपण राजकारणात नव्हतात. आता जर तुम्हाला कंठ फुटला असेल तर मग टीका सोसवायची तयारी ठेवा. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे देखील  हेच मत असल्याचे समजत असल्याचे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

राहुल गांधी यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करणाऱ्या आणि सावरकरांबाबत आग्रही भुमिका मांडणाऱ्या शिवसेनेला भाजपाने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांविषयीची भुमिका शिवसेनेने स्पष्ट करावी, मुख्यमंत्रीपदासाठी लाचार झाले, राहुल गांधी यांचा निषेध करून दाखवाच, अशी आव्हाने भाजपाने शिवसेनेला दिली होती. त्याचवेळी हिवाळी अधिवेशन असल्याने उद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीती भाजपाने आखली होती. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसअमृता फडणवीसशिवसेनाभाजपाराहुल गांधीमहाराष्ट्र सरकार