Goa Election 2022: “उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 10:56 AM2021-09-29T10:56:52+5:302021-09-29T10:58:34+5:30

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

shiv sena sanjay raut to visit goa over upcoming elections in 2022 | Goa Election 2022: “उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत

Goa Election 2022: “उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे आता गोव्याला निघालोय, आम्ही तिकडे २२ जागांवर लढू”: संजय राऊत

Next
ठळक मुद्देशिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणारबाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होतेआम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे

मुंबई: पुढील वर्षी होणाऱ्या विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. यात सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांकडे असणार आहे. तर, विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांत गोव्याचाही समावेश असून, गेल्या दोन ते तीन दिवसांतील घडामोडीनंतर राजकीय मोर्चेबांधणीने वेग घेतला आहे. तसेच गोव्यातील राजकारण तापतानाही पाहायला मिळत आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोव्यात दाखल होत आहेत. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. (shiv sena sanjay raut to visit goa over upcoming elections in 2022)

शिवसेना खासदार संजय राऊतगोवा दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे चाललो आहे. बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

आम्ही तिकडे २२ जागांवर लढू

संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही

आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. भाजप कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते. आमचे गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आम्ही स्वबळावर लढू, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, शिवसेनेने सामना अग्रलेखातून गोव्यातील भाजप सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल. अल्बुकर्कने गोवा जिंकले व ४५० वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवले. गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये, असे टीकास्त्र शिवसेनेने सोडले आहे. 
 

Web Title: shiv sena sanjay raut to visit goa over upcoming elections in 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.