Shiv Sena MLAs made an argument to the Chief Minister, they are not getting funds | शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही

शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली कैफियत, निधी मिळत नाही

यदु जोशी ।

मुंबई : मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यादेश काढले जात नाहीत. आपले सरकार असताना कामे होत नाहीत, अशा तक्रारींचा पाढाच शिवसेनाआमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वाचला. या तक्रारींचा रोख मुख्यत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे सध्या शिवसेनाआमदारांच्या विभागनिहाय बैठकी घेत आहेत. सोमवारी पश्चिम महाष्टÑातील आमदारांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या आमदारांचे निधीबाबत लाड होतात. आम्हाला ताटकळत ठेवले जाते. एखाद्या योजनेंतर्गत कामे देताना त्यांना झुकते माप दिले जाते, असा सूर या आमदारांनी लावला. लॉकडाऊनमुळे शासनाची आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे निधीची अडचण असल्याचे आम्ही मतदारांना सांगतो पण बाजूच्या मतदारसंघात कामे होत असतील व आमच्याकडे ती होत नसतील तर काय सांगायचे? अशी कैफियत काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. विशेषत: राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये निधीबाबत दुजाभाव केला जातो असा सूर काही आमदारांनी लावला.
‘संबंधितांशी बोलून व प्रसंगी आदेश देऊन तुमच्या तक्रारी दूर करेन’ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिले असेही सूत्रांनी सांगितले.

अधिकारी हजर असल्याने मन मोकळे करणे कठीण
मुख्यमंत्री ठाकरे हे शिवसेना आमदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील दोन ज्येष्ठ आयएएस अधिकारी उपस्थित असतात. ते नसते तर आम्हाला अधिक मोकळेपणाने उद्धवजींकडे भावना मांडता आली असती, असे एका आमदाराने लोकमतला सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena MLAs made an argument to the Chief Minister, they are not getting funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.