Join us
Daily Top 2Weekly Top 5

'संजय राऊत यांची सुरक्षा फक्त 10 मिनिटं हटवा, मग काय होतं ते बघा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 21:32 IST

संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे.

मुंबई: शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान दिले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कुणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील. तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे.''असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. यावर संजय राऊत यांनी फक्त 10 मिनिटे तुमची सुरक्षा हटवा, मग काय होतं ते बघा असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्या; संजय राऊत यांचे उदयनराजेंना आव्हान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते.

'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला टीकेचे अधिक लक्ष्य केले. ते म्हणाले की,'' मुंबईला असलेल्या शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यावर शिवसेनेने उत्तर दिले पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. पण सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही काही जणांची लायकी आहे. शिवसेनेकडून शिववडा नावाचा वडापाव सुरू करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केले पाहिजे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला होता. 

पाहा संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखतः

टॅग्स :नीतेश राणे संजय राऊतशिवसेनाभाजपाउदयनराजे भोसलेमहाराष्ट्र सरकार