CM Uddhav Thackeray Speech Live: CM Uddhav Thackeray: राज, फडणवीस, राणा, सोमय्या, ओवेसी, महागाई; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाहा महत्वाचे मुद्दे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 21:28 IST2022-05-14T19:43:53+5:302022-05-14T21:28:32+5:30
गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावला.

CM Uddhav Thackeray Speech Live: CM Uddhav Thackeray: राज, फडणवीस, राणा, सोमय्या, ओवेसी, महागाई; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील पाहा महत्वाचे मुद्दे!
आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. आता फडणवीस म्हणतात आम्हाला गधाधारी म्हणतात. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे-
- लढायचं असेल तर सरळ या...- उद्धव ठाकरे
- कोरोनावेळी वाजवलेल्या थाळ्या, अजूनही रिकाम्या- उद्धव ठाकरे
- कायद्याचा दुरुपयोग करु नका- उद्धव ठाकरे
- हनुमानाचा अपमान करु नका, ते आमच्या हद्यात आहे- उद्धव ठाकरे
- बोबड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंचा किरीट सोमय्यांवर नाव न घेता निशाणा
- आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही- उद्धव ठाकरे
- मराठी मातृभाषा आहे, हे आपलं भाग्य आहे- उद्धव ठाकरे
- राज्यात एक भगवी शाल घेऊन मुन्नाभाई फिरत आहे, त्याला फिरु द्या- उद्धव ठाकरे
- आता एक एक प्रकरण बाहेर येत आहे- उद्धव ठाकरे
- प्रमोद महाजन म्हाळगी प्रबोधिनीची जबाबदारी पार पाडत. मी गेलो, पाहिलं आणि विचारलं इथे काय करता? त्यांनी सांगितलं की आम्ही इकडे कार्यकर्ते घडवतो. मग आता जे आहेत ते कोण? प्रबोधिनीत संस्कार घेतलेले सहस्त्रबुद्धेंसारखे गेले कुठे?- उद्धव ठाकरे
- तुझा संबंध काय, काय बोलतेस, काय करतेस- उद्धव ठाकरेंचा केतकीला सवाल
- उद्धव ठाकरेंनी अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर देखील टीका केली
- तुम्ही हिंदुत्वाचा विकार करताय, ही मनोरुग्ण माणसं आहेत- उद्धव ठाकरे
- महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला उत्तर द्या- उद्धव ठाकरे
- सभा, उत्तरसभा असेच चाळे सुरु ठेवणार आहात का?- उद्धव ठाकरे
- बाबरी मशीद पाडली, तेव्हा तुमचं वय काय होतं?, तुम्ही शाळेच्या सहलीला गेला होतात का?- उद्धव ठाकरे
- देवेंद्र फडणवीस तुम्ही जर बाबरी मशीद तोडायला गेला असता, तर बाबरी तोडायची गरज नव्हती, ती तुमच्या वजनाने पडली असती- उद्धव ठाकरे
- तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं?- उद्धव ठाकरे
- आम्ही काँग्रेससोबत उघड गेला; तुमच्यासारखी पहाटे शपथविधी केला नाही- उद्धव ठाकरे
- झेड प्लस सुरक्षा या टिनपाटांना देणार का?- उद्धव ठाकरे
- टॉमेटो लावून पत्रकार परिषद घेतात, उद्धव ठाकरेंची नाव न घेता भाजपाचे नेते किरीट सोमय्यांवर टीका
- उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर देखील निशाणा- उद्धव ठाकरे
- महागाईवर कुणाही बोलायला तयार नाही, लाज नाही, लज्जा नाही- उद्धव ठाकरे
- आम्हाला म्हणता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, मग माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचा भाजपा राहिला आहे का?- उद्धव ठाकरे
- देशभरात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे- उद्धव ठाकरे
- आज मला बोलायलाच हवं- उद्धव ठाकरे
- मुंबई स्वातंत्र्य करण्याचा डाव सुरु आहे- उद्धव ठाकरे
- मुंबईचा लचका जो तोडेल, त्याचे जनता लचके तोडेल- उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरेंचा पहिला निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर
- गाढवानं लाथ मारण्याआधीच आम्ही त्यांना सोडलं- उद्धव ठाकरे
- खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले देशाला भरकवटत आहे- उद्धव ठाकरे
- बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- ओवेसी महाराष्ट्रात २०१४पासून येत आहे. गेली पाच वर्षे कबरीसमोर झुकत आहे. आतापर्यंत २० वेळा कबरीसमोर गेला आहे- संजय राऊत
- मंत्री आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा १५ जून रोजी होणार- संजय राऊत
- १५ जून चलो अयोध्या- संजय राऊत
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हाला देशाचं नेतृत्व करायचं आहे- संजय राऊत
- आज काश्मिरमध्ये पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिसून येत आहे- संजय राऊत
- औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला- संजय राऊत
- आजही औरंगजेबाशी आपली लढाई सुरु आहे- संजय राऊत
- ओवेसींकडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान- संजय राऊत
- हिंदुत्वाचा पराभव आम्ही होऊ देणार नाही- संजय राऊत
- शिवसेना कुणापुढे झुकणार नाही- संजय राऊत
- शिवसेनेचं हिंदुत्व छत्रपती संभाजीराजे यांच्यासारखं आहे- संजय राऊत
- खऱ्या तोफा काय असतात हे आज महाराष्ट्राला दिसलं- संजय राऊत
- मुंबईचा बाप एकच, तो म्हणजे शिवसेना- संजय राऊत
- कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने खूप चांगलं काम केलं. जगभरातून मुंबईचं कौतुक करण्यात आलं- आदित्य ठाकरे
- इथे आज जोरदार बॅटींग होणार आहे- आदित्य ठाकरे
- मला सभास्थळी येताना माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी आजी मीनाताई ठाकरे या शिवसैनिकांच्या गर्दीत दिसली- आदित्य ठाकरे
- सभेला तुफान गर्दी झाली आहे- मंत्री आदित्य ठाकरे
- हिंदुत्वाचा मुद्दा सर्वांत पहिला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हाती घेतला- मंत्री एकनाथ शिंदे
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचले
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभास्थळी रवाना