Join us

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 00:27 IST

काँग्रेसचे कांदिवली प्रभाग क्र. २८ मधील नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयावर सोमवारी लघुवाद न्यायालयाने शिक्कामोर्तब केले

मुंबई : काँग्रेसचे कांदिवली प्रभाग क्र. २८ मधील नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयावर सोमवारी लघुवाद न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणारे शिवसेना उमेदवार एकनाथ (शंकर) हुंडारे यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच सभागृहात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर पोहोचणार आहे.

पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे राजपती यादव हे निवडून आले होते. मात्र त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार शिवसेनेचे शंकर हुंडारे यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. या तपासणीत यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय एप्रिल २०१९ रोजी समितीने दिला होता. त्यानुसार तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यादव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा महासभेत केली होती.

मात्र या निर्णयाविरोधात यादव यांनी आधी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही न्यायालयांनी यादव यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे लघुवाद न्यायालयाने हुंडारे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले.एकनाथ हुंडारे यांच्या नावाची लवकरच सभागृहात घोषणा

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाकाँग्रेसमहाराष्ट्रउद्धव ठाकरेभाजपा