Join us
Daily Top 2Weekly Top 5

14 फेब्रुवारीला शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; 'या' नेत्याने केले मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 14:24 IST

राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम केर्टात सुनावणी सुरू आहे.

राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे शिवसेना कोणाची यावरुन सुप्रीम केर्टात सुनावणी सुरू आहे, काल केंद्रीय निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हा संदर्भात सुनावणी झाली. या पार्श्वभूमिवर आज काँग्रेस नेते नाना पटोले यांनी 14 फेब्रुवारी रोजी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकार 14 फेब्रुवारी कोसळेल असा दावा केला. "राज्यातील चाललेल हे सरकार असंविधानीक सरकार आहे, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर 14 फेब्रुवारी निकाल लागेल. आमचा न्यायालयावर विश्वास आहे, असंही नाना पटोले म्हणाले. 

धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा मोठा दावा

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, त्यांची अजुन कोणतीही भूमिका संदिग्ध नाही, ही फक्त माध्यमात चर्चा आहे. त्यांचा अपघात झाला आहे म्हणून ते प्रचारात असतील का नाही माहित नाही, ते पक्षासोबत असतील, असंही नाना पटोले म्हणाले. 

धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. आता दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्हासाठीही दोन्ही गटांनी दावा केला आहे. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आज सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह शिवसेनेच्या ठाकरे गटाचा की, शिंदे गटाचा यावरून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणीवेळी कपिल सिब्बल म्हणाले, 'घटनेनुसार शिंदे गटाची प्रतिनिधी सभा नाही, राष्ट्रीय कार्यकारणीला मुदवाढ द्या अथवा निवडणूक घ्या, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे.

यावेळी कपिल सिब्बल यांनी विधीमंडळ आणि राजकीय पक्षाची तुलना केली. विधीमंडळ पक्षातील संख्याबळाची निवडणूक आयोगासमोर माहिती दिली. घटनेनुसार प्रतिनिधी सभा आमच्याकडेच आहे, असा युक्तिवादही कपिल सिब्बल यांनी केला आहे. 

सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी आयोगासमोर युक्तिवाद केला. कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते. कपिल सिब्बल यांनी पक्षाची घटना वाचायला सुरुवात केली.

टॅग्स :नाना पटोलेकाँग्रेसएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस